'हाऊसफुल्ल-५' चा प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर दबदबा; जमवला इतक्या कोटींचा गल्ला, पण कसा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:52 IST2025-06-02T13:49:04+5:302025-06-02T13:52:41+5:30

'हाऊसफुल्ल-५' चा प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर दबदबा, कमावले इतके कोटी

housefull 5 movie advance booking collection starrer akshay kumar nana patekar and riteish deshmukh | 'हाऊसफुल्ल-५' चा प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर दबदबा; जमवला इतक्या कोटींचा गल्ला, पण कसा? 

'हाऊसफुल्ल-५' चा प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर दबदबा; जमवला इतक्या कोटींचा गल्ला, पण कसा? 

Housefull 5 Movie: मागील काही दिवसांपासून मनोरंजनविश्वात 'हाऊसफुल्ल-५' (Housefull 5 Movie) या मल्टिस्टारर चित्रपटाबद्दल चर्चा सुरु आहे. हाऊसफुल्ल या लोकप्रिय फ्रेंचायझीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. या फ्रेंचायझीचे पहिले ४ भाग प्रचंड गाजले. त्यानंतर आता हाऊसफुल्ल-५ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तरुण मनसुखानी दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ६ जूनला सर्वत्र रिलीज होणार आहे. दरम्यान, प्रदर्शनाला ४ दिवसांपूर्वीच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दबदबा निर्माण केला आहे. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये बक्कळ कमाई केली आहे. 

'हाऊसफुल ५' च्या प्रदर्शनासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, त्यात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चित्रपटाने चांगलाच गल्ला जमवला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, हाऊसफुल्ल-५ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंगमध्ये पहिल्या दिवशी २४,२३८ तिकिटे विकली गेली, ज्यातून ८७.८४ लाख रुपयांचा व्यवसाय झाला आहे. ब्लॉक सीट्ससह, हा आकडा ३.८४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांच्या मनात किती उत्सुकता निर्माण झाली आहे, हे .यावरुन स्पष्ट होत आहे.

'हाऊसफुल ५' या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली असून तरुण मनसुखानी यांनी दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या टीझरला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने 'UA 16+' रेटिंग दिले आहे. या सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे. यात अक्षय कुमार,अभिषेक बच्चन ,जॅकलीन फर्नांडिस, संजय दत्त ,नर्गिस फाखरी, फरदीन खान, जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत. तर मराठमोळे नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे हे कलाकारही आहेत.  

Web Title: housefull 5 movie advance booking collection starrer akshay kumar nana patekar and riteish deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.