ऑस्करमधील वादापासून Will Smithच्या पर्सनल आयुष्यात खळबळ, पत्नीपासून घेणार घटस्फोट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 18:16 IST2022-04-22T18:14:09+5:302022-04-22T18:16:58+5:30
Will Smith and Jada Pinkett-Smith : पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने अभिनेता विल स्मिथने होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. आता बातमी अशी समोर येत आहे की, या प्रकारामुळे विल स्मिथच्या पर्सनल लाइफमध्ये मोठं संकट आलं आहे.

ऑस्करमधील वादापासून Will Smithच्या पर्सनल आयुष्यात खळबळ, पत्नीपासून घेणार घटस्फोट?
हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. यावेळी झालेल्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील वाद तर तुम्हाला माहीत असेलच. पत्नीची खिल्ली उडवली गेल्याने अभिनेता विल स्मिथने (Will Smith) होस्ट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली होती. आता बातमी अशी समोर येत आहे की, या प्रकारामुळे विल स्मिथच्या पर्सनल लाइफमध्ये मोठं संकट आलं आहे.
आता अशी जोरदार चर्चा होऊ लागली आहे की, विल आणि त्याची पत्नी जेडा (Jada Pinkett-Smith) यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. हॉलिवूडमध्ये कपलच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. द न्यूज इंटरनॅशनलच्या रिपोर्टनुसार, विल स्मिथ आणि जेडा पिंकेट स्मिथ हे आता मोठ्या मुश्कीलीने एकमेकांशी बोलतात. ते एकमेकांसोबत बोलणं टाळतात. असंही सांगितलं जात आहे की, दोघांमधील तणाव जास्त वाढला असून प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं आहे.
Heat मॅगझिननुसार, जेव्हापासून ऑस्करमध्ये ते प्रकरण झालं तेव्हापासून दोघांमध्ये तणाव वाढला आहे. दोघांमध्ये अनेक वर्षांपासून वाद होता, पण आता स्थिती ही आहे की, दोघे एकमेकांसोबत बोलतही नाहीत. जर दोघे वेगळे झाले तर विल स्मिथला मोठं आर्थिक नुकसान होईल. विल स्मिथ सध्या ३५० मिलियन डॉलरच्या संपत्तीचा मालक आहे. कॅलिफोर्नियाच्या कायद्यानुसार, घटस्फोट झाला तर यातील अर्धी रक्कम त्याला पत्नीला द्यावी लागेल. हा सेलिब्रिटींमधील सर्वात वाईट घटस्फोट ठरू शकतो. हा घटस्फोट एंजेलिना जोली आणि ब्रॅड पिट यांच्यापेक्षाही जास्त लांब खेचला जाऊ शकतो.
आता विल स्मिथ आणि जेडामधील तणावाची चर्चा किती खरी आहे हे तर फॅन्स कसंही करून माहिती करून घेतील. पण फॅन्स दोघांमधील हा पाहून हैराण नक्कीच झाले आहेत. हे तर स्पष्टच आहे की कॅमेरासमोर सेलिब्रिटी त्यांचं कितीही प्रेम दाखवत असले तरी रिअल लाइफमध्ये त्यांची नाती काही वेगळीच असतात. विल आणि जेडा यांच्या नात्यात बऱ्याच वर्षांपासून तणाव सुरू आहे.