टॉम अँड जेरी सिनेमाचा ट्रेलर आऊट, या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 13:15 IST2020-11-18T12:10:35+5:302020-11-18T13:15:34+5:30
टॉम अँड जेरी एकमेकांच्या मागे धावताना दिसणार आहेत.

टॉम अँड जेरी सिनेमाचा ट्रेलर आऊट, या तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
लहानांपासून मोठ्यापर्यंत टॉम अँड जेरी पाहायला आवडत नाही असे फार कमी लोक असतील. गेली अनेक वर्षे या कार्टुनने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. पुन्हा एकदा टॉम अँड जेरी एकमेकांच्या मागे धावताना दिसणार आहेत. वार्नर ब्रेसने टॉम अँड जेरीचा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर रिलीज करताना वार्नर म्हणाला, टॉम आणि जेरी इतक्या लवकर लोकांचा पाठलाग सोडणार नाहीत.
वॉर्नर ब्रदर्सच्या बॅनरखाली तयार होणार सिनेमा पूर्णपणे अॅनिमेटेड नाही. हे केवळ टॉम, जेरी आणि काही प्राण्यांसाठी अॅनिमेशनचा वापर करण्यात आला आहे. तसेच ट्रेलरदेखील मूळ चित्रपटासारखाच आहे. चित्रपटातील टॉम आणि जेरीच्या भांडण अगदी वास्तविक ठेवली आहे. हॉटेलमध्ये एक मोठा व्हीआयपी विवाह होणार आहे परंतु तेथील कर्मचारी जेरीमुळे नाराज आहेत. जेरीला पकडण्यासाठी टॉमला घेतले आणि त्यानंतर त्यांच्यातील मजेदार भांडण सुरू होते. आतापर्यंत लाखो व्हुज आणि लाईक्स ट्रेलरला आलेले आहेत. . 2021ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.