२३ वर्षाने लहान गर्लफ्रेन्डसोबत Leonardo Dicaprio चं रोमॅंटिक व्हेकेशन, दोघांचे फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 17:55 IST2022-01-08T17:47:29+5:302022-01-08T17:55:28+5:30
Leonardo Di Caprio : लिओनार्डोचे आणि कॅमिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही St.Barts गेटवे दरम्यान एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले.

२३ वर्षाने लहान गर्लफ्रेन्डसोबत Leonardo Dicaprio चं रोमॅंटिक व्हेकेशन, दोघांचे फोटो झाले व्हायरल
हॉलिवूड सिनेमा टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो सध्या सिनेमामुळे नाही तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. सध्या त्याच्या पर्सनल लाइफची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण तो नुकताच त्याची गर्लफ्रेन्ड Camila Morrone सोबत समुद्रात एन्जॉय करताना दिसला.
लिओनार्डोचे आणि कॅमिलाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघेही St.Barts गेटवे दरम्यान एकमेकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसले. फोटोंमध्ये कॅमिला बॉयफ्रेन्ड लिओनार्डोसोबत रोमान्स करताना दिसत आहे. कधी ती त्याच्या कडेवर आहे तर कधी लिपलॉक करताना दिसत आहे.
२३ वर्षांचं आहे वयाचं अंतर
लिओनार्डो आणि कॅमिला २०१७ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमध्ये वयाचं २३ वर्षांचं अंतर आहे. लिओनार्डो ४७ चा आहे तर कॅमिला २४ वर्षांची. वयात इतका फरक असूनही दोघांमध्ये बॉन्डींग चांगलं बघायला मिळतं. सध्या त्यांच्या या रोमॅंटिक फोटोंची चर्चा रंगली आहे.
फेब्रुवारी २०२० मध्ये दोघांनी ऑस्कर इव्हेंटमध्ये कपल म्हणून एन्ट्री घेतली होती. दोघेही ऑस्कर इव्हेंटमध्ये फ्रंट रोमध्ये बसले होते. अनेक ठिकाणी एकत्र दिसूनही लिओनार्डो आणि कॅमिलाने आतापर्यंत त्यांच्या रिलेशनशिपवर अधिकृत किंवा सार्वजनिकपणे काहीच जाहीर केलं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लिओनार्डो आणि कॅमिला लॉकडाऊनमुळे एकत्र वेळ घालवतात. दोघे अनेक महिने एकाच घरात राहिले.