Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:13 IST2025-05-27T13:12:56+5:302025-05-27T13:13:35+5:30

'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा पाहताना महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणण्याची वेळ महिलेवर आली आहे. 

theater ceiling fall on women while watching final destination on her birthday | Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्...

Final Destination सिनेमा बघताना महिला मरता मरता वाचली, थिएटरचं छत अंगावर कोसळलं अन्...

हॉलिवूडच्या गाजलेल्या थरारक सिनेमांपैकी एक म्हणजे 'फायनल डेस्टिनेशन' चित्रपटाची सीरिज. भारतातही 'फायनल डेस्टिनेशन' सिनेमा लोकप्रिय आहे. या सिनेमाचा पुढचा भाग म्हणजे 'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र हा सिनेमा पाहताना महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणण्याची वेळ महिलेवर आली आहे. 

Fiamma Villaverde ही २९ वर्षीय महिला तिचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी 'फायनल डेस्टिनेशन ब्लडलाइन' सिनेमा बघायला गेली होती. तिच्यासोबत तिची ११ वर्षाची मुलगी आणि तिचा मित्र होते. 'फायनल डेस्टिनेशन' बघताना थिएटरचं सिलिंग कोसळून महिलेच्या अंगावर पडलं. त्यामुळे सिनेमा बघतानाच महिलेच्या समोर मृत्यू येऊन उभा ठाकल्यासारखं झालं होतं. अर्जेंटिनामधील एका थिएटरमध्ये हा प्रसंग घडला. पण, यातून महिला सुखरूप वाचली असून तिच्या पायाला दुखापत झाली आहे. 

या संपूर्ण प्रकारानंतर महिला म्हणाली, "त्यादिवशी माझा वाढदिवस होता. आम्ही बाहेर फिरायला गेलो असताना थिएटर दिसलं. त्यादिवशी सिनेमाचं तिकीट थोडं कमी होतं म्हणून आम्ही सिनेमा पाहायचं ठरवलं. आम्ही पॉपकॉर्न घेतले आणि सीटवर जाऊन बसलो. सिनेमा संपत असतानाचा माझ्यावर स्लॅब पडला". यानंतर महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. 

Web Title: theater ceiling fall on women while watching final destination on her birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.