'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारलेला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार; 'ऑस्कर'वर टाकला बहिष्कार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 17:45 IST2026-03-16T17:42:29+5:302026-03-16T17:45:27+5:30

हॉलिवूडच्या इतिहासात अनेक वादग्रस्त आणि अविस्मरणीय घटना घडल्या आहेत, पण १९७३ च्या ऑस्कर सोहळ्यातील एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.

the godfather movie actor marlon brando rejected oscar 1973 reason behind | 'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारलेला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार; 'ऑस्कर'वर टाकला बहिष्कार, कारण...

'या' दिग्गज अभिनेत्याने नाकारलेला बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार; 'ऑस्कर'वर टाकला बहिष्कार, कारण...

हॉलिवूडच्या इतिहासात अनेक वादग्रस्त आणि अविस्मरणीय घटना घडल्या आहेत, पण १९७३ च्या ऑस्कर सोहळ्यातील एका घटनेने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते. सुपरस्टार मार्लन ब्रँडो यांनी त्यांच्या 'द गॉडफादर' (The Godfather) या अजरामर चित्रपटासाठी मिळालेला 'सर्वोत्कृष्ट अभिनेता' हा ऑस्कर पुरस्कार नाकारला होता. इतकेच नाही तर ते या पुरस्कार सोहळ्याला उपस्थितही राहिले नाहीत. त्यामागचं कारण ऐकून सर्वजण स्तब्ध झाले होते.

पुरस्कार नाकारण्याचे कारण काय?

 मार्लन ब्रँडो हे केवळ एक महान अभिनेते नव्हते, तर ते मानवी हक्कांसाठी लढणारे कार्यकर्ते देखील होते. अमेरिकन चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगामध्ये मूळ अमेरिकन लोकांचे (Native Americans) ज्या प्रकारे चित्रण केले जात होते, त्याबद्दल ते अत्यंत नाराज होते. हॉलिवूडमधील चित्रपटांमध्ये रेड इंडियन्सना नेहमीच क्रूर किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवले जाते, याचा निषेध म्हणून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला.




जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मार्लन ब्रँडो यांच्या नावाची घोषणा झाली, तेव्हा सर्वांना वाटले की ते मंचावर येतील. मात्र, त्यांच्या ऐवजी साचीन लिटलफेदर (Sacheen Littlefeather) नावाची एक तरुण मूळ अमेरिकन कार्यकर्ती मंचावर आली. तिने पारंपारिक वेशभूषा केली होती. जेव्हा मार्लन ब्रँडोंच्या ऐवजी तिला ऑस्करची ट्रॉफी दिली जात होती, तेव्हा तिने ठामपणे नकार दिला.

मंचावर उभ्या असलेल्या साचीनने मार्लन ब्रँडो यांचे १५ पानांचे भाषण वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी तिने ते न वाचण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले की, "मार्लन ब्रँडो हे अत्यंत खेदाने हा पुरस्कार स्वीकारू शकत नाहीत, कारण आजच्या चित्रपट सृष्टीत अमेरिकन भारतीयांना दिली जाणारी वागणूक योग्य नाही." हे ऐकून तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी टाळ्या वाजवल्या, तर काहींनी जोरात आरडाओरडा करून निषेध व्यक्त केला.

ऑस्करच्या इतिहासातील पहिलीच घटना

एखाद्या अभिनेत्याने राजकीय आणि सामाजिक कारणासाठी ऑस्करसारखा प्रतिष्ठित पुरस्कार नाकारण्याची ही पहिलीच वेळ होती. या घटनेमुळे हॉलिवूडमध्ये मोठी खळबळ माजली आणि चित्रपटसृष्टीला मानवी हक्कांच्या विषयावर गांभीर्याने विचार करायला भाग पाडले. मार्लन ब्रँडो यांचा हा निर्णय आजही हॉलिवूडमधील सर्वात धाडसी निर्णयांपैकी एक मानला जातो.

Web Title : मार्लन ब्रैंडो का ऑस्कर बहिष्कार: मूल अमेरिकी अधिकारों के लिए एक स्टैंड।

Web Summary : मार्लन ब्रैंडो ने 'द गॉडफादर' के लिए 1973 में अपना ऑस्कर पुरस्कार हॉलीवुड द्वारा मूल अमेरिकियों के नकारात्मक चित्रण का विरोध करते हुए अस्वीकार कर दिया। साचीन लिटिलफेदर ने उनका प्रतिनिधित्व किया, उनकी ओर से पुरस्कार लेने से इनकार कर दिया, जिससे विवाद छिड़ गया और फिल्म उद्योग के भीतर नागरिक अधिकारों के मुद्दों पर प्रकाश डाला गया।

Web Title : Marlon Brando's Oscar boycott: A stand for Native American rights.

Web Summary : Marlon Brando rejected his 1973 Oscar for 'The Godfather,' protesting Hollywood's negative portrayal of Native Americans. Sacheen Littlefeather represented him, refusing the award on his behalf, sparking controversy and highlighting civil rights issues within the film industry.