अजब! चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस, Video पाहून तुम्हीही जाल चक्रावून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 17:39 IST2021-05-22T17:39:30+5:302021-05-22T17:39:52+5:30
हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली बऱ्याचदा हटके फोटोंमुळेदेखील चर्चेत येत असते.

अजब! चक्क मधमाश्यांना अंगावर घेत अँजेलिनानं केलं शूट करण्याचं धाडस, Video पाहून तुम्हीही जाल चक्रावून
हॉलिवूडची अभिनेत्री अँजेलिना जोली तिच्या सौंदर्यासाठी खूप लोकप्रिय आहे. तसेच ती बऱ्याचदा हटके फोटोंमुळेदेखील चर्चेत येत असते. त्यासाठी नेहमी वेगळं काहीतरी करण्याचा तिचा हट्टाहास असतो. मात्र यावेळी तिने जे काही केलं आहे ते पाहून सर्वजण चक्रावून गेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की नेमकं काय केलंय तिने. यावेळी तिने चक्क मधमाशांना अंगावर घेत फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे.
अँजेलिना जोलीने हे फोटोशूट आंतरराष्ट्रीय मधमाशी दिवस साजरा करण्यासाठी केले आहे. या दिवसाचे औचित्य साधून अँजेलिनाने जवळपास एक हजार मधमाशांमध्ये फोटोशूट केले आहे. वायरल झालेल्या फोटोंमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की कित्येक मधमाशा अँजेलिनाच्या कपड्यांवर आहेत. तिचा गळा, खांदे आणि तोंडावरही मधमाशा पाहायला मिळत आहेत. फोटोमध्ये अँजेलिनाने एक ऑफ शोल्डर ब्लॉउज परिधान केला आहे. या मधमाशा डैन विन्टर्स यांच्या पाळीव मधमाशा आहेत. हे फोटोशूट नॅशनल जिओग्राफिकच्या सौजन्याने केले गेले आहे.
विशेष बाब म्हणजे अँजेलिनाच्या अंगावर जवळपास १८ मिनिटे मधमाशा होत्या. डैन विन्टर्स यांच्या माहितीनुसार, मधमाशा शांत राहाव्यात आणि त्यांनी अँजेलिनाला कोणत्याही प्रकारची इजा करू नये, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली होती. खूप काळजी घेत हे फोटोशूट पूर्ण केले गेले.अँजेलिनाच्या या धाडसाचे काही चाहते कौतुक करत आहेत तर काही तिची चेष्टा करत आहेत.