लग्नाच्या वर्षभरात प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई! गोंडस मुलीला दिला जन्म, चाहत्यांकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 14:54 IST2026-04-03T14:49:40+5:302026-04-03T14:54:19+5:30

प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाच्या वर्षभरातच आई झाली आहे. मुलगी झाल्याने अभिनेत्रीच्या आनंदाला उधाण आले आहे.

sinners movie actress hailee steinfeld becomes mother within a year of marriage | लग्नाच्या वर्षभरात प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई! गोंडस मुलीला दिला जन्म, चाहत्यांकडून अभिनंदन

लग्नाच्या वर्षभरात प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई! गोंडस मुलीला दिला जन्म, चाहत्यांकडून अभिनंदन

हॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि ऑस्कर नामांकित 'सिनर्स' सिनेमाली स्टार हेली स्टेनफेल्ड (Hailee Steinfeld) सध्या तिच्या आयुष्यातील एका अत्यंत आनंदाच्या टप्प्यावर आहे. हेली आणि तिचा पती, NFL स्टार जोश ॲलन (Josh Allen) यांनी आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. हेलीने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून, या बातमीने त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हेली आणि जोश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. ३ एप्रिल २०२६ रोजी त्यांना मुलगी झाली. ही बातमी समोर आल्यानंतर हॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि क्रीडा विश्वातील मान्यवरांनी या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हेली आणि जोश या कपलचे जगभरात चाहते असल्याने त्यांचे चाहतेही या बातमीने आनंदी झाले आहेत.


हेली स्टेनफेल्ड आणि जोश ॲलन गेल्या काही काळापासून एकमेकांना डेट करत होते आणि त्यांच्या नात्याची चर्चा नेहमीच मीडियामध्ये असायची. २०२५ च्या मे महिन्यात  त्यांनी अत्यंत खासगी पद्धतीने विवाह केला होता. आता त्यांच्या आयुष्यात या नवीन पाहुणीचे आगमन झाल्याने त्यांचे कुटुंब पूर्ण झाले आहे. हेलीने तिच्या गरोदरपणाच्या काळातही आपल्या सिनेमांचं शूटिंग सुरुच ठेवलं होतं, ज्यामुळे चाहत्यांनी कौतुक केलं आहे.

हेली स्टेनफेल्ड ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर एक लोकप्रिय गायिका देखील आहे. 'पिच परफेक्ट' आणि 'हॉकआय' सारख्या प्रोजेक्ट्समुळे तिची जगभरात मोठी फॅन फॉलोइंग आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्रीची आईच्या रुपातली दुसरी इनिंग पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक होते. सोशल मीडियावर 'बेबी गर्ल'च्या आगमनानंतर नेटकऱ्यांनी "हेली आता एका नवीन आणि सुंदर प्रवासाला सुरुवात करत आहे," अशा कमेंट्स करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title : अभिनेत्री हेली स्टेनफेल्ड और एनएफएल स्टार जोश एलन ने बेटी का स्वागत किया!

Web Summary : हेली स्टेनफेल्ड और जोश एलन ने खुशी से अपनी बेटी के आगमन की घोषणा की। 2025 में निजी तौर पर शादी करने वाले इस जोड़े ने सोशल मीडिया पर खुशखबरी साझा की, प्रशंसकों और मशहूर हस्तियों से बधाई प्राप्त हुई। स्टेनफेल्ड ने गर्भावस्था के दौरान भी शूटिंग जारी रखी और प्रशंसक उनकी मातृत्व यात्रा के लिए उत्साहित हैं।

Web Title : Actress Hailee Steinfeld and NFL Star Josh Allen Welcome Baby Girl!

Web Summary : Hailee Steinfeld and Josh Allen joyfully announce the arrival of their baby girl. Married privately in 2025, the couple shared the happy news on social media, receiving congratulations from fans and celebrities worldwide. Steinfeld continued filming during her pregnancy and fans are excited for her motherhood journey.