पाहुण्यांकडून करारावर सही, हनिमूनचं ठिकाणही ठरलं! प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 16:16 IST2026-04-10T16:14:57+5:302026-04-10T16:16:52+5:30
प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे. या गायिकेने लग्नाचं स्थळ बाहेर जाऊ नये, म्हणून पाहुण्यांकडून एका करारावर सही केलीये.

पाहुण्यांकडून करारावर सही, हनिमूनचं ठिकाणही ठरलं! प्रसिद्ध गायिकेच्या लग्नाची तुफान चर्चा
हॉलिवूडची पॉप सुपरस्टार टेलर स्विफ्ट (Taylor Swift) आणि एनएफएल (NFL) स्टार ट्रॅव्हिस केल्सी (Travis Kelce) यांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली चर्चा होती. पण आता ही चर्चा संपणार आहे. कारण, या जोडीने त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित केली असून ३ जुलै २०२६ रोजी ते विवाहबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांच्या लग्नाची तारीख १३ जून असल्याचे बोलले जात होते, मात्र आता ३ जुलै ही तारीख पक्की करण्यात आल्याची चर्चा आहे.
लग्नाचे ठिकाण आणि तारीख
टेलर आणि ट्रॅव्हिस यांनी न्यूयॉर्क शहराची (New York City) निवड त्यांच्या लग्नासाठी केली आहे. याआधी रोड आयलंडमधील 'ओशन हाऊस' येथे लग्न होणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र आता हा सोहळा न्यूयॉर्कमधील एका आलिशान इनडोअर लोकेशनवर पार पडण्याची शक्यता आहे. ३ जुलै ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण म्हणजे अमेरिकेचा 'इंडिपेंडन्स डे'. यावर्षी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २५० वर्षे पूर्ण होत असल्याने हा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांनी ही तारीख निवडली आहे.
रिपोर्ट्सनुसार, लग्नाची निमंत्रण पत्रिका आधीच जवळच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आली आहेत. हा सोहळा अत्यंत खासगी ठेवण्यासाठी पाहुण्यांना 'नॉन-डिस्क्लोजर एग्रीमेंट' (NDA) वर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. म्हणजेच लग्नाची गोपनीय माहिती बाहेर फोडू नये, असं सांगण्यात आलं आहे. या सोहळ्याला सेलेना गोमेझ, गिगी हदीद, एम्मा स्टोन आणि पॅट्रिक महोम्स यांसारख्या दिग्गज सेलिब्रिटींची उपस्थिती असण्याची शक्यता आहे.
इतकंंच नव्हे तर, फ्रांस, बहामास, इटली, क्रोएशिया, सिंगापुर, ग्रीस, आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या ठिकाणी हे दोघे हनिमून साजरा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ट्रॅव्हिस केल्सीने नुकताच कॅन्सस सिटी चीफ्ससोबत नवा करार केला असून, जुलैच्या अखेरीस त्याचे ट्रेनिंग कॅम्प सुरू होणार आहेत. त्यापूर्वीच लग्न उरकून या जोडीला हनिमूनसाठी वेळ मिळावा, या हिशोबाने जुलैच्या सुरुवातीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
अद्याप टेलर स्विफ्ट किंवा ट्रॅव्हिस केल्सी यांनी अधिकृतपणे यावर शिक्कामोर्तब केलेले नाही, तरीही जगभरातील 'स्विफ्टीज' (टेलरचे चाहते) या वर्षातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटी लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.