Sienna Weir: 'मिस युनिव्हर्स' फाइनलिस्टचं अवघ्या 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झालेला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 14:25 IST2023-05-06T14:19:47+5:302023-05-06T14:25:18+5:30
सिएनाच्या निधनाच्या बातमीने तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

Sienna Weir: 'मिस युनिव्हर्स' फाइनलिस्टचं अवघ्या 23 व्या वर्षी निधन; घोडेस्वारी करताना झालेला अपघात
'मिस युनिव्हर्स 2022'मध्ये (Miss Universe 2022) आपल्या सौंदर्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या मॉडेल सीएना वीरचं (Sienna Weir) निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी मॉडेलने जगाचा निरोप घेतला. गेल्या महिन्यात घोडेस्वारी करताना तिचा अपघात झाला होता. यानंतर तिला रुग्णालयात लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले पण उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
मीडिया रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियातील विंडसर पोलो मैदानात घोडेस्वारी करताना तिला अपघात झाला होता, ती अचानक घोड्यावरुन खाली पडली. यानंतर तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण जवळपास महिन्याभरानंतर तिचा दुर्देवी अंत झाला.
सिएनाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. सिएनाला व्हेंटिलेटरवरून काढण्याचा निर्णय घेत कुटुंबाने ही माहिती शेअर केली. या बातमीने त्याच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सिएना सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचा मोठा चाहतावर्ग आहे. जगभरातील अनेक फॅशन शोमध्ये सिएना सहभागी झाली आहे.
'मिस युनिव्हर्स 2022' या स्पर्धेत सिएना शेवटच्या टप्प्यात पोहोचली होती. सिडनीच्या विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्य आणि मनोविज्ञान या विषयांत पदवीचं शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी ती युकेला (United Kingdom) जाण्याचा मॉडेल विचार करत होती. मात्र त्याआधीचं तिने जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाच्या बातमीने सर्वत्र हळहळ व्यक्त होते.