'हॅरी पॉटर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन, साकारलेली 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:09 IST2025-03-11T13:09:22+5:302025-03-11T13:09:47+5:30

'हॅरी पॉटर' सिनेमात भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालंय

Popular actor from Harry Potter simon fisher becker dies at the age of 63 | 'हॅरी पॉटर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन, साकारलेली 'ही' भूमिका

'हॅरी पॉटर' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्याचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन, साकारलेली 'ही' भूमिका

'हॅरी पॉटर' सिनेमा (harry potter) लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा. या सिनेमातील एका अभिनेत्याचं निधन झाल्याची बातमी समोर येतेय. 'हॅरी पॉटर'मध्ये भूमिका साकारलेल्या सायमन फिशर बेकर  (simon fisher becker) या अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येतेय. ९ मार्चला वयाच्या ६३ व्या वर्षी सायमन यांनी अखेरचा श्वास घेतला. सायमन यांची पत्नी टोनी,  त्यांची पीआर टीम यांनी अभिनेत्याच्या निधनाच्या दुःखद बातमीला पुष्टी दिली आहे.

'हॅरी पॉटर' सिनेमात साकारलेली भूमिका

सायमन यांनी 'हॅरी पॉटर'च्या पहिल्या भागात अर्थात 'हॅरी पॉटर अँड फिलोसॉफर स्टोन' सिनेमात फॅट फ्रायर नावाच्या भूताची भूमिका साकारली होती. याशिवाय 'डॉक्टर हू' सिनेमात सायमन यांनी निळ्या रंगाचं शरीर असलेल्या ब्लॅक मार्केटर डोरियम माल्डोवर ही भूमिका साकारली होती. सायमन यांच्या या दोन्ही भूमिका चांगल्याच गाजल्या. याशिवाय सायमन यांनी ‘लेस मिजरेबल्स, ‘पपी लव’, ‘गेटिंग ऑन’, आणि ‘द बिल’ या सिनेमांमध्येही काम केलंय.


ब्रिटीश रंगभूमीपासून सायमन यांनी त्यांच्या अभिनयाची सुरुवात केली. पुढे अनेक लोकप्रिय हॉलिवूड सिनेमांमध्ये त्यांनी काम केलंय. सायमन यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. "मी एक चांगला अभिनेता गमावला आहेच शिवाय चांगला मित्रही गमावला आहे", अशा शब्दांमध्ये सायमनच्या सहकलाकारांनी आणि त्यांच्या मित्रांनी दुःख व्यक्त केलंय.

 

Web Title: Popular actor from Harry Potter simon fisher becker dies at the age of 63

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.