Oscars2024: चक्क श्वानासाठी होती सेलिब्रेटी चेअर; पुरस्कार सोहळ्यातील तो श्वान ठरतोय चर्चेचा विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 11:34 IST2024-03-11T11:31:28+5:302024-03-11T11:34:35+5:30

Oscars2024: या श्वानाला अन्य कलाकारांप्रमाणेच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे.

oscars-2024-anatomy-of-a-fall-messi-surprises-everyone-with-his-appearance-at-the-96th-academy-awards-ceremony | Oscars2024: चक्क श्वानासाठी होती सेलिब्रेटी चेअर; पुरस्कार सोहळ्यातील तो श्वान ठरतोय चर्चेचा विषय

Oscars2024: चक्क श्वानासाठी होती सेलिब्रेटी चेअर; पुरस्कार सोहळ्यातील तो श्वान ठरतोय चर्चेचा विषय

कलाविश्वातील मानाचा आणि प्रतिष्ठितचा मानला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. कॅलिफोर्नियामधील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या दिमाखात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदाच्या या ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात जगभरातील अनेक दिग्गज कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. मात्र, या सगळ्यांमध्ये एक श्वास आकर्षणाचं आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

सध्या सोशल मीडियावर ऑस्कर २०२४ चे अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये एक श्वान चांगलाच चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे या श्वानाला अन्य कलाकारांप्रमाणेच व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असून तो चर्चेचा विषय ठरत आहे. इतकंच नाही तर हा श्वान नेमका कोण आहे? आणि, तो या पुरस्कार सोहळ्यात काय करतोय? असा प्रश्न अनेकांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.

कोण आहे हा सेलिब्रिटी श्वान?

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.यात स्पॉटलाइट फक्त एकाच सेलिब्रिटीवर होता तो म्हणजे या सोहळ्यात सहभागी झालेला श्वान. पुरस्कार सोहळ्यात दिसत असलेला हा श्वान ७ वर्षांचा असून मेस्सी असं त्याचं नाव आहे. ॲनाटॉमी ऑफ अ फॉलमधील या सिनेमामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे सिनेमात अनेकांचं लक्ष वेधून घेणारा हा श्वान ऑस्करमध्येही चर्चेत राहिला.

Web Title: oscars-2024-anatomy-of-a-fall-messi-surprises-everyone-with-his-appearance-at-the-96th-academy-awards-ceremony