Oscar 2023: विल स्मिथने लगावलेली कानशिलात अजून विसरला नाही क्रिस रॉक?, म्हणाला- ज्या ठिकाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:05 IST2022-08-30T15:41:17+5:302022-08-30T16:05:37+5:30
क्रिस रॉकने ऑस्कर 2023 चे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. क्रिसने 2022 च्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर विनोद केला होता

Oscar 2023: विल स्मिथने लगावलेली कानशिलात अजून विसरला नाही क्रिस रॉक?, म्हणाला- ज्या ठिकाणी
क्रिस रॉकने ऑस्कर 2023 चे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला आहे. त्याने असे का केलं असा प्रश्न सर्वांना पडला आहे, यामागचे कारण विल स्मिथ. होय, विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानाखाली वाजवली होती. यानंतर विल स्मिथने ख्रिस रॉकची माफीही मागितली. पण, कदाचित क्रिस रॉक ही घटना विसरलेला नाही. त्याने २०२३च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन करण्यास नकार दिला.
क्रिसने रविवारी फिनिक्स, ऍरिझोना येथील ऍरिझोना फायनान्शियल थिएटरमध्ये एका कॉमेडी शोदरम्यान याचा खुलासा केला. ऑस्कर 2023 च्या होस्टिंग प्रस्तावावर चर्चा करताना, क्रिस रॉक म्हणाला, "ज्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला त्याच ठिकाणी एखाद्याला जाण्यास सांगण्यासारखेच आहे."
विल स्मिथने का वाजवली होती कानाखाली?
क्रिसने 2022 च्या ऑस्कर सोहळ्यादरम्यान विलची पत्नी जाडा पिंकेट स्मिथच्या पत्नीच्या शारिरीक व्यंगावर विनोद केला होता. अभिनेता विल स्मिथ (Will Smith) याला अजिबात सहन झाले नाही. म्हणून त्याच आवेशात तो उठला आणि थेट जाऊन कार्यक्रमाचा सुत्रसंचालक तथा प्रसिद्ध अभिनेता क्रिस रॉक याच्या कानशिलात लागावली होती.
Chris Rock declines offer to host 2023 Oscars after Will Smith slap: Reports
— ANI Digital (@ani_digital) August 30, 2022
Read @ANI Story | https://t.co/g3eTC5HxXk#ChrisRock#Oscars2023#WillSmithpic.twitter.com/TRXpISXI2A
विल स्मिथने माफी मागितली आणि म्हणाला...
माफीच्या व्हिडीओमध्ये, विल म्हणाला "मी रॉकची माफी मागायला गेलो होतो पण तो बोलायला तयार नव्हता." मला मीडियाद्वारे ख्रिसला सांगायचे आहे, मी तुझी माफी मागतो. माझे वर्तन अस्वीकार्य होते आणि तू जेव्हा तयार असशील तेव्हा मी तुझी माफी मागायला तयार आहे.