२ तास ४२ मिनिटांच्या 'या' सिनेमाने ऑस्करमध्ये मारली बाजी, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होतोय स्ट्रीम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 12:03 IST2026-03-16T11:53:13+5:302026-03-16T12:03:24+5:30
oscars 2026: सर्वोत्कृष्ट चित्रपट ते अन्य कॅटेगरीतही दबदबा! ऑस्कर गाजवणारा 'हा' सिनेमा ओटीटीवर उपलब्ध, कुठे बघाल?

२ तास ४२ मिनिटांच्या 'या' सिनेमाने ऑस्करमध्ये मारली बाजी, 'या' OTT प्लॅटफॉर्मवर होतोय स्ट्रीम
One Battle After Another : कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठित मानला जाणारा ९८ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान, यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात १३ नामांकनं मिळवणाऱ्या 'one battle after another' या चित्रपटाने सहा पुरस्कारांवर आपलं नाव कोरलं. त्यामुळे मनोरंजन जगतात या चित्रपटाबद्दल चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या या अभुतपूर्व यशामुळे चाहते त्याबद्दल जाणून घेण्यास आणखी उत्सुक आहेत. 'वन बॅटल आफ अदर' गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि हा सिनेमा ओटीटीवर उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया की, तुम्ही हा चित्रपट कुठे पाहू शकता...
दरम्यान, ९८ व्या ऑस्कर अकादमी पुरस्कारांमध्ये पॉल थॉमस अॅंडरसनचा यांच्या ब्लॅक कॉमेडी अॅक्शन-थ्रिलर 'वन बॅटल अफ्टर अनदर' ने बाजी मारली आहे.
मात्र, तुम्हाला माहितीये का दमदार अॅक्शन-थ्रिलर असणारा या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नव्हतं. आता ऑस्करमुळे हा सिनेमा पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. दमदार कथा आणि उत्तम स्टारकास्ट असलेला हा सिनेमा तुम्हाला जागेवर खिळवून ठेवणारा आहे. 'वन बॅटल अफ्टर अनदर' हा चित्रपट तुम्ही JioHotstar या OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हा चित्रपट २६ फेब्रुवारीपासून OTT वर स्ट्रीम करण्यात आला आहे.
कथानक
या चित्रपटात वडील आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. ही कथा बॉब नावाच्या व्यक्तीभोवती फिरते, जो त्याची मुलगी विला सोबत एक साधं जीवन जगतो. अचानक १६ वर्षांनंतर, बॉबचा जुना शत्रू (शॉन पेन) परत येतो आणि त्याची मुलगी बेपत्ता होते. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी या लक्ष वेधून घेतात. चित्रपटातील प्रत्येक सीन पाहून तुम्ही एका जागेवरून हलणारच नाही.
'वन बॅटल आफ्टर अदर' हा एक कॉमेडी-थ्रिलर चित्रपट आहे. २ तास ४२ मिनिटांच्या या सिनेमाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन पॉल थॉमस अँडरसन यांनी केलं आहे. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियो, शॉन पेन, बेनिसियो डेल टोरो, रेजिना हॉल, तेयाना टेलर आणि चेस इन्फिनिटी या कलाकारांच्या भूमिका आहेत. १००० कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या हॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६०० कोटी रुपये कमावले होते.