OMG ! शकीराने केली तब्बल ११८ कोटींची कर चोरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 15:54 IST2018-12-17T15:53:18+5:302018-12-17T15:54:02+5:30
सुप्रसिद्ध सिंगर, डान्सर, परफॉर्मर शकीराला कोण ओळखत नाही. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारी शकीरा यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, शकीरावर कर चोरीला आरोप लागला आहे.

OMG ! शकीराने केली तब्बल ११८ कोटींची कर चोरी?
सुप्रसिद्ध सिंगर, डान्सर, परफॉर्मर शकीराला कोण ओळखत नाही. आपल्या गाण्यांमुळे चर्चेत राहणारी शकीरा यावेळी मात्र एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. होय, शकीरावर कर चोरीला आरोप लागला आहे. स्पेनच्या अभियोजन पक्षाने शकीरावर १४. ५ मिलियन युरोचा (सुमारे ११८ कोटी रूपये) कर बुडवल्याचा आरोप ठेवला आहे. शकीरा २०१५ मध्ये बहामासमधून स्पेनच्या बर्सिलोनामध्ये स्थायिक झाली होती. अभियोजन पक्षाच्या दाव्यानुसार, शकीरा २०१२ ते २०१४ या काळातही स्पेनमध्ये वास्तव्यास होती. या दोन वर्षांतील आयकर तिने स्पेनमध्ये भरायला हवा.
अद्याप शकीराने यासंदर्भात आपली बाजू मांडलेली नाही. पण तिच्या एका जवळच्या सूत्राने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ज्या काळातील कर चोरीचा आरोप केला जात आहे, त्या काळात शकिरा स्पेनमध्ये राहत नव्हती, असे सूत्रांनी म्हटले आहे.
याऊलट अभियोजन पक्षाच्या दाव्यानुसार, २०१२ ते २०१४ या काळात शकीरा तिचा पार्टनर गेरार्ड पिक याच्यासोबत स्पेनमध्ये होती. केवळ कामासाठी अधूनमधून स्पेनबाहेर गेली होती. आता पुराव्यानंतरच या प्रकरणातील खरे तथ्य समोर येणार आहे. स्पेनच्या नियमानुसार, देशात ६ महिने ते १ वर्षांपासून राहणाºया कुठल्याही व्यक्तिस कर चुकवावा लागतो.
वयाच्या १०व्या वर्षी शकीराने आपल्या शाळेत एका ग्रूपमध्ये गाणे गायले. पण, तिचा आवाज एखाद्या बकरीसारखी असल्याचे सांगून तिला गाणे गाण्यापासून रोखण्यात आले. पण, शकीराने हार मानली नाही.
शकीराचे पहिले दोन अल्बम सुपर फ्लॉप झाले. पण, तिचा तिसरा अल्बम मात्र तिला चांगलेच यश देऊन गेला. शकीराने २०१०मध्ये फीफा वर्ल्डकपचे थीम सॉन्ग आॅफिशिअली गायले आणि ते रातोरात प्रचंड सुपरहिट झाले. हे सॉंन्ग युट्यूबवर असंख्य लोकांनी पाहिले आहे.