ब्रह्मचारी होण्यास निघालेला अभिनेता होणार तब्बल दहाव्यांदा पिता; गर्लफ्रेंडचे टॉपलेस मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 16:44 IST2022-08-28T16:44:17+5:302022-08-28T16:44:39+5:30

Nick Cannon: ४१ वर्षीय निक सध्या मॉडेल ब्रिटनी बेलासोबत रिलेशनमध्ये असून ब्रिटनी तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. यापूर्वी तिला ५ वर्षाचा मुलगा गोल्डन सॅगन आणि १९ महिन्यांची पॉवरफूल क्वीन ही मुलगी आहे.

nick cannon to soon welcome his tenth child his third kid with ex girlfriend brittany bell | ब्रह्मचारी होण्यास निघालेला अभिनेता होणार तब्बल दहाव्यांदा पिता; गर्लफ्रेंडचे टॉपलेस मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

ब्रह्मचारी होण्यास निघालेला अभिनेता होणार तब्बल दहाव्यांदा पिता; गर्लफ्रेंडचे टॉपलेस मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होताना दिसत आहे. अलिकडेच बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला. तिच्यानंतर आता एका हॉलिवूड अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. हा अभिनेता चक्क १० व्यांदा वडील होणार आहे.

हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन निक कॅनन (Nick Cannon)दहाव्यांदा पिता होणार असून त्याच्या गर्लफ्रेंडने अलिकडेच टॉपलेस मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सध्या ही जोडी चर्चेत आहे. कॅननने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.

४१ वर्षीय निक सध्या मॉडेल ब्रिटनी बेलासोबत रिलेशनमध्ये असून ब्रिटनी तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. यापूर्वी तिला ५ वर्षाचा मुलगा गोल्डन सॅगन आणि १९ महिन्यांची पॉवरफूल क्वीन ही मुलगी आहे. त्यानंतर आता ब्रिटनी तिसऱ्यांदा आई होत आहे. तर, कॅनन दहाव्यांदा पिता होत आहे. कॅनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ब्रिटनी टॉपलेस मॅटर्निटी फोटोशूट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत कॅनन, मुलगा आणि मुलगीदेखील दिसून येत आहेत.

निक कॅनन याला ब्रिटनीपासून गोल्डन आणि पॉवरफूल क्वीन ही दोन मुलं असले तरीदेखील त्याला दुसऱ्या पार्टनरपासूनही मुलं आहेत. निकने प्रसिद्ध गायिका मारिया कॅरेसोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यांना मुनरो आणि मोरक्कन ही दोन जुळी मुलं आहेत. त्यानंतर त्याला ब्रे टेसीपासून एक मुलगा आहे. इतकंच नाही तर प्रसिद्ध डीजे एबी दे ला रोजा हिच्यापासून पुन्हा दोन जुळी मुलं असून ते सध्या १३ महिन्यांचे आहेत. तसंच गायिका अलिसा स्कॉटपासूनही त्याला एक मुलगा झाला होता. मात्र, २०२१ मध्ये ब्रेन कॅन्सरमुळे त्याचं निधन झालं.

दरम्यान, २०२१ मध्ये आपण ब्रह्मचारी होणार असल्याचं निकने म्हटलं होतं. मात्र, २०२२ मध्ये त्याने मॉडेल ब्रे टेसी आणि तो एका बाळाचे पालक होणार असल्याचं जाहीर केलं. त्याच्या या खुलाशानंतर चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

Web Title: nick cannon to soon welcome his tenth child his third kid with ex girlfriend brittany bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.