विजय सेतुपती याचा 'महाराजा' आवडला? मग आता 'हा' थरारक सिनेमा बघाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 15:21 IST2024-11-13T15:20:41+5:302024-11-13T15:21:21+5:30
हा सिनेमा जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे.

विजय सेतुपती याचा 'महाराजा' आवडला? मग आता 'हा' थरारक सिनेमा बघाच!
विजय सेतुपतीच्या 'महाराजा' सिनेमाने सध्या सगळीकडे धुमाकूळ घातलाय. अनेकांना हा सिनेमा आवडलाय. जर तुम्हालाही 'महाराजा' सिनेमा आवडला असेल तर आम्ही तुमच्यासाठी 'महाराजा' सारखाच अंगावर शहारे आणणारा एक सस्पेंन्स - थ्रिलर चित्रपट घेऊन आलो आहोत. सध्या हा चित्रपट जागतिक ट्रेंडिंग यादीत शीर्षस्थानी आहे. आतापर्यंत 28 दशलक्षाहून अधिक लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे.
एका सायको किलरची कथा असलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या चित्रपटाचे नाव आहे 'Dont Move'. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर 25 ऑक्टोबर 2024 रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर तो जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. तर भारतात हा सिनेमा चौथ्या क्रमांकावर आहे.
'Dont Move' हा एक अमेरिकन क्राइम थ्रिलर आहे.ज्यात केल्सी एल्बिल मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये केल्सीच्या पात्राचे नाव इरिस आहे. हा सिनेमा एडम शिंडलर आणि ब्रायन नेटो यांनी दिग्दर्शित केले आहे. 1 तास 32 मिनिटांच्या या चित्रपटाच्या कथेतील प्रत्येक वळणावर तुम्हाला जबरदस्त सस्पेन्स पाहायला मिळेल. या चित्रपटात असे ट्विस्ट आहेत की प्रेक्षक गोंधळून जातात.