'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला-
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 16:25 IST2025-05-17T16:22:23+5:302025-05-17T16:25:37+5:30
‘मिशन इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’ सिनेमाच्या निमित्ताने टॉम क्रूझने भारतीयांशी हिंदीत संवाद साधला आहे. याशिवाय भारतीय सिनेमांबद्दल प्रेम दर्शवलं आहे

'मिशन इम्पॉसिबल' फेम टॉम क्रूझ पाहतो बॉलिवूड सिनेमे, खास हिंदी भाषेत साधला सर्वांशी संवाद, म्हणाला-
हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझचे जगभरात लाखो चाहते आहेत आणि भारतातही त्यांचा स्वतःचा फॅनबेस आहे. त्याचा आगामी अॅक्शनपट ‘मिशन: इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग’च्या प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर टॉम क्रूझने भारताबद्दलचे प्रेम व्यक्त केले असून भारतीय चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली आहे. टॉम असा एकमेव हॉलिवूड स्टार असेल ज्याला भारताबद्दल इतकं प्रेम आहे. टॉम काय म्हणाला बघा
एका मुलाखतीत टॉम क्रूझने भारताची संस्कृती, सिनेमा आणि लोकांविषयी त्याच्या आठवणी शेअर केल्या. टॉम म्हणाला, "माझं भारतावर खूप प्रेम आहे. भारत हा एक अतिशय सुंदर देश आहे. इथली संस्कृती, इथले लोक सगळंच विलक्षण आहे. मी भारतात घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत घर करून बसला आहे. मी ताजमहाल पाहिलं, मुंबई काही वेळ वेळ होतो, हे सगळं आजही आठवतं."
टॉम क्रूझ पुढे म्हणाला, "मी पुन्हा भारतात यायचं ठरवलं आहे. मला भारतात चित्रपट करायचा आहे. मला बॉलीवूड चित्रपट खूप आवडतात. इथल्या सिनेमांमध्ये अभिनय, गाणं आणि नृत्याचं जे एकत्रित सादरीकरण केलं जातं, ते खूपच खास आणि सुंदर आहे. जेव्हा एखाद्या दृश्यात अचानक गाणं सुरु होतं, ते बघणं फारच मोहक असतं. मी लहानपणापासून म्युझिकल्स पाहतो आहे पण बॉलीवूडमधला रंग, नाद, ऊर्जा काही वेगळीच आहे."
टॉम क्रूझ पुढे म्हणाला, "मी पुन्हा भारतात येण्याची वाट पाहतोय. इथे माझे अनेक चांगले मित्र आहेत. मला इथे खूप छान लोक भेटले आहेत. आणि मला बॉलीवूडसारखा चित्रपट करायचा आहे. ज्यात गाणं, नाचणं आणि अभिनय असेल. हे सगळं खूप मजेशीर असेल." अशाप्रकारे टॉमने भारताविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. 'मिशन: इम्पॉसिबल – द फाइनल रेकनिंग' अमेरिकेआधी भारतात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये तसेच 4DX आणि IMAXसारख्या मल्टी-फॉर्मेटमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा १८ मे पासून संपूर्ण भारतात रिलीज होत आहे.