ब्रेक के बाद! जॉनी डेप तब्बल ६ वर्षांनी करणार कमबॅक, काय आहे चित्रपटाचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 17:08 IST2025-04-16T17:05:43+5:302025-04-16T17:08:03+5:30
जॉनी डेपसाठी हा चित्रपट खूप खास आहे.

ब्रेक के बाद! जॉनी डेप तब्बल ६ वर्षांनी करणार कमबॅक, काय आहे चित्रपटाचं नाव
'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' (Pirates of the Caribbean) या चित्रपटामुळे जगभरात लोकप्रिय झालेला हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप (Johnny Depp) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जॉनी डेप आपल्या अभिनयाची जादू पसरवण्यास सज्ज आहे. तब्बल ६ वर्षांनी तो मोठ्या पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटातील जॉनीचा लूकही समोर आला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. चाहते आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत.
जॉनी डेपच्या या नव्या चित्रपटाचं नाव 'डे ड्रिंकर' असं आहे. जॉनी डेपसाठी हा चित्रपट खूप खास आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे. यात जॉनीसोबत पेनेलोप क्रूझ दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मार्क वेब यांनी केले आहे. तर सिनेमाची कथा झॅक डीन यांनी लिहिली आहे. चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, याबद्दल अद्याप तारीख समोर आलेली नाही.
जॉनी डेपसाठी हा चित्रपट खूप खास आहे. कारण, पूर्वश्रमीची पत्नी अँबर हर्ड (Amber Heard) पासून घटस्फोट घेतल्यानंतर हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे. अँबर हर्डने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. २०१८ मध्ये, यूकेच्या एका न्यायालयाने अँबर हर्डच्या बाजूने निकाल दिला होता, परंतु २०२२ मध्ये जॉनीने अमेरिकेत अंबरविरुद्ध मानहानीचा खटला जिंकला होता. या घटस्फोटाची प्रचंड चर्चा झाली होती.
जॉनी डेप हा एक प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता आहे. ज्याने १९८० च्या दशकात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याला '२१ जंप स्ट्रीट' या टीव्ही शोमधून लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांचा पहिला हिट चित्रपट एडवर्ड सिझरहँड्स (१९९०) होता, ज्यामधील त्यांच्या अनोख्या व्यक्तिरेखेची सर्वत्र प्रशंसा झाली. त्यानंतर त्याने अनेक वेगवेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत, ज्यात 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन' मालिकेतील कॅप्टन 'जॅक स्पॅरो'चा समावेश आहे. तो त्याच्या अनोख्या शैलीसाठी आणि अभिनयाच्या विविधतेसाठी ओळखला जातो.