Jeremy Renner Accident : 'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 05:12 PM2023-01-22T17:12:54+5:302023-01-22T17:13:54+5:30

Jeremy Renner Accident : 'अॅव्हेंजर' चित्रपटांमध्ये हॉकआयचे पात्र साकारणाऱ्या जेरेमी रेनरचा भीषण अपघात झाला आहे.

Jeremy Renner Accident : 'Avenger' fame actor Jeremy Renner's terrible accident; More than 30 bones were broken | Jeremy Renner Accident : 'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली...

Jeremy Renner Accident : 'Avenger' फेम अभिनेता जेरेमी रेनरचा भीषण अपघात; 30हून अधिक हाडे मोडली...

googlenewsNext

Jeremy Renner Accident : लोकप्रिय 'अॅव्हेंजर' चित्रपटांमध्ये हॉकआयचे पात्र साकारणाऱ्या जेरेमी रेनर (Jeremy Renner) काही दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर जेरेमीने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करुन माहिती दिली होती. पण, आता जेरेमीने अजून एक फोटो शेअर करुन अपघाताची भीषणता सांगितली. त्याने सांगितल्यानुसार, या अपघातात जेरेमीची 30 अधिक हाडे मोडली आहेत. 

52 वर्षीय जेरेमी रेनरने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या तब्येतीबाब माहिती दिली आहे. जेरेमीने सांगितले की, स्नो प्लोइंगदरम्यान झालेल्या अपघातात 30 हून अधिक हाडे मोडली आहेत. ही पोस्ट वाचून त्याच्या चाहत्यांना जबर धक्का बसला.

या महिन्याच्या सुरुवातीला त्याचा अपघात झाला होता. जेरेमी त्याच्या पोस्टमध्ये बेडवर पडलेला दिसत आहे. यात तो कोणाच्या तरी मदतीने स्ट्रेचिंग एक्सरसाइज करताना दिसत आहे. या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वादासाठी सर्वांचे आभार मानलेत.

अपघात कसा झाला?
जेरेमी रेनरचा अपघात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या घराजवळ झाला होता. अपघातानंतर त्याला दोन आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारीच त्याला रुग्णालयातून घरी आणले आहे. सध्या घरातच त्याच्यावर उपचार होणार आहेत. जेरेमी रेनरची पोस्ट समोर येताच चाहते त्याच्या तब्येतीबद्दल चिंतेत आहेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

Web Title: Jeremy Renner Accident : 'Avenger' fame actor Jeremy Renner's terrible accident; More than 30 bones were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.