Avatar 2 Advance Booking: भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:19 PM2022-12-06T17:19:49+5:302022-12-06T17:20:58+5:30

Avatar 2 Advance Booking: 2009 साली रिलीज झालेल्या जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने जगभर धुमाकूळ घातला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल येतोय...

james cameron film Avatar 2 Advance Booking in india Avatar The Way of Wate | Avatar 2 Advance Booking: भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Avatar 2 Advance Booking: भारतीय फॅन्स ‘अवतार 2’च्या प्रेमात,  रिलीजआधीच जमवला इतक्या कोटींचा गल्ला

googlenewsNext

Avatar 2 Advance Booking: 2009 साली रिलीज झालेल्या जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार’ या सिनेमाने जगभर धुमाकूळ घातला होता.  सर्वांना खिळवून ठेवत सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. आता तब्बल 13 वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वल अर्थात दुसरा भाग ‘अवतार- द वे ऑफ वॉटर’  (Avatar The Way of Wate) येतोय आणि हा सीक्वल पाहण्यास चाहते कमालीचे उत्सुक आहेत. ‘अवतार 2’च्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहून तुम्हालाही याची खात्री पटेल.

 ‘अवतार 2’ येत्या 16 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होतोय. सिनेमा प्रदर्शित व्हायला आणखी 10 दिवसांचा अवकाश आहे. पण त्याआधीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, आत्ताच भारतात या चित्रपटाची 1 लाख 121 तिकीटं विकली गेली आहेत. यात 84  हजारांहून अधिक तिकीटं 3डीची आहेत. ही सगळी तिकीटं विकून या मेकर्सनी भारतात 4.24 कोटींची कमाई केली आहे. हा आकडा येत्या एक-दोन दिवसांत 5 कोटींवर पोहोचेल, असा विश्वास जाणकार व्यक्त करत आहेत.  

‘अवतार- द वे ऑफ वॉटर’ची कथा 2009मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अवतार’चा पुढचा भाग असणार आहे.  सली परिवाराच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर सली कुटुंब कशापद्धतीने मात करेल, हे सेकंड पार्टमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  एक-दोन नाही तर जगभरातील तब्बल 160 भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होतोय. भारतीय प्रेक्षक इंग्रजीशिवाय हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम या भाषेत हा सिनेमा प्रेक्षक बघू शकतील.  

2009 मध्ये ‘अवतार’ रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.   हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अगदी या चित्रपटानं  ‘टायटॅनिक’लाही मागे टाकलं होतं. अवघ्या सहा आठवड्यांत ‘अवतार’नं  1 अब्ज 85 डॉलरची कमाई केली होती. ‘अवतार’ला दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले होते.   हा चित्रपट 23 कोटी डॉलरच्या बजेटमध्ये बनवला गेला होता, ज्याला तेव्हाचा सर्वात महागडा चित्रपट म्हटलं गेलं होतं.  

Web Title: james cameron film Avatar 2 Advance Booking in india Avatar The Way of Wate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.