'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रुझच्या आयुष्यात रशियन ब्युटीची एन्ट्री, ६१ वर्षीय अभिनेता पुन्हा प्रेमात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 19:10 IST2024-02-13T19:08:27+5:302024-02-13T19:10:09+5:30

Tom Cruise: तीन लग्नानंतर 61 वर्षीय अभिनेता पुन्हा प्रेमात पडला.

hollywood star Tom Cruise dating Russian model at the age of 61 rumours spread | 'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रुझच्या आयुष्यात रशियन ब्युटीची एन्ट्री, ६१ वर्षीय अभिनेता पुन्हा प्रेमात?

'मिशन इम्पॉसिबल' स्टार टॉम क्रुझच्या आयुष्यात रशियन ब्युटीची एन्ट्री, ६१ वर्षीय अभिनेता पुन्हा प्रेमात?

'मिशन इम्पॉसिबल' (Mission Impossible) फेम ६१ वर्षीय हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ (Tom Cruise) पुन्हा प्रेमात पडला आहे. याही वयात तो कमालीचा हँडसम दिसत असल्याने अनेक तरुणी त्याच्यावर फिदा आहेत. दरम्यान ताज्या माहितीनुसार, एका रशियन ब्युटीवर टॉम क्रुझ भाळला आहे. दोघंही बऱ्याच ठिकाणी सोबत दिसत असून तिच्याच घरी सध्या तो राहत असल्याच्याही चर्चा आहेत. कोण आहे ही रशियन अप्सरा?

टॉम क्रूझच्या आयुष्यात 36 वर्षीय एल्सिना खायरोवा या रशियन ब्युटीची एन्ट्री झाली आहे.टॉमने तिच्यासोबतचं नातं जगजाहीरही केलं आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार गेल्या काही दिवसांपासून दोघंही एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून अगदी कपलसारखेच ते फिरत आहेत. व्हॅलेंटाईन डे च्या मुहुर्तावरच टॉमच्या आयुष्यात नवीन प्रेम फुललं आहे. सध्या दोघंही आपली प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र तरी ही खबर आता चाहत्यांपासून लपलेली नाही. 

नुकतंच लंडनच्या एअर अँब्युलन्स चॅरिटी सपोर्टसाठी आयोजित डिनरसाठी दोघांनी एकत्र हजेरी लावली. प्रिंस विलियम्स यासाठी पाहुणे म्हणून उपस्थित होते. टॉमच्या निकटवर्तियांनीही कन्फर्म केले की दोघंही एल्सिनाच्या मल्टी मिलियन डॉलर अपार्टमेंटमध्ये सोबत वेळ घालवतात. तर कधी लंडनच्या एक्सक्लूझिव्ह रेस्टॉरंटमध्येही डिनरसाठी भेटतात. 

टॉम क्रुझच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर त्याची तीन लग्न झाली आहेत. त्याला तीन मुलंही आहेत. त्याने पहिलं लग्न १९८७ साली मिमी रॉगर्ससोबत केलं होतं. १९९० साली त्यांचा घटस्फोट झाला. त्याचवर्षी टॉमच्या आयुष्यात निकल किडमन आली. मात्र ते २००१ साली वेगळे झाले. हे नातं तुटल्यानंतर टॉम जवळपास 5 वर्षानंतर केटी होम्ससोबत रिलेशनशिपमध्ये होता. २००६ साली त्यांनी लग्न केले. मात्र २०१२ साली त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

Web Title: hollywood star Tom Cruise dating Russian model at the age of 61 rumours spread