VIDEO : ‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला झालंय तरी काय? नव्या व्हिडीओनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:36 IST2022-04-25T15:58:16+5:302022-04-25T16:36:48+5:30

Robert Downey Jr's Latest Video : रॉबर्ट सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओत रॉबर्ट अतिशय अशक्त दिसतोय.

Hollywood star Robert Downey Jr's Latest Video Fans Worried About Actor's Health | VIDEO : ‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला झालंय तरी काय? नव्या व्हिडीओनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

VIDEO : ‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाउनी ज्युनिअरला झालंय तरी काय? नव्या व्हिडीओनं वाढवलं चाहत्यांचं टेन्शन

Robert Downey Jr's Latest Video : हॉलिवूडचा सुपरस्टार ‘आयर्नमॅन’  रॉबर्ट डाउनी  ज्युनिअरचे (Robert Downey Jr.) जगभर असंख्य चाहते आहेत.  रॉबर्ट हॉलिवूडचा लोकप्रिय सुपरस्टार आहे. जगभरात त्याचे असंख्य चाहते आहेत. सोशल मीडियावर लाखो लोक त्याचे फॉलोअर्स आहेत. त्यामुळे रॉबर्ट साधा शिंकला तरी चाहते टेन्शनमध्ये येतात. सध्या रॉबर्टचे चाहते असेच टेन्शनमध्ये आले आहेत. होय, रॉबर्टचा ताजा व्हिडीओ व फोटो पाहून चाहत्यांना त्याच्या तब्येतीची चिंता सतावू लागली आहे.

रॉबर्ट सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. त्याने अलीकडे एक व्हिडीओ शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला. व्हिडीओत रॉबर्ट अतिशय अशक्त दिसतोय. अगदी ओळखू येऊ नये, अशा अवस्थेत रॉबर्टला पाहून चाहते चिंता व्यक्त करू लागले.

‘हा रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर आहे, यावर विश्वास बसत नाहीये,’अशी कमेंट एका युजरने केली. अन्य एका चाहत्याने भावुक कमेंट केली. ‘तुला म्हातारं होताना पाहताना खूप वाईट वाटतंय,’असं या चाहत्याने लिहिलं.

 2007 साली ‘आयर्नमॅन’ या सुपरहिरोपटापासून सुरू झालेली अ‍ॅव्हेंजर्स मालिका आज जगातील सर्वात मोठी चित्रपटमालिका म्हणून ओळखली जाते. मार्व्हल कंपनीनं मिळवलेल्या या भव्यदिव्य यशामागं आयर्नमॅन व्यक्तिरेखा साकारणा-या  रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा सिंहाचा वाटा आहे.

रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हा मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्ससाठी हुकुमाचा एक्का मानला जायचा. आजवर त्याच्याच लोकप्रियतेचा वापर करून मार्व्हलनं सलग 22सुपरहिट चित्रपट दिलेत ते त्यामुळेच.  अ‍ॅव्हेंजर्स एंडगेमचा पहिला भाग अ‍ॅॅव्हेंजर्स इन्फिनिटी वॉरसाठी त्याला मानधन म्हणून 216कोटी रुपये देण्यात आले होते.  आयर्न मॅनची भूमिका करणा-या रॉबर्ट डाउनी ज्युनियरने मार्व्हल स्टुडिओसोबतचा करार संपवला असला तरी अद्यापही तो काम करतोय.

Web Title: Hollywood star Robert Downey Jr's Latest Video Fans Worried About Actor's Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.