हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:12 IST2025-06-01T12:12:19+5:302025-06-01T12:12:47+5:30
सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे.

हॉलिवूड सिंगर रिहानावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिंगरच्या वडिलांचं ७०व्या वर्षी निधन
सुप्रसिद्ध आणि जगभरात नाव कमावलेली हॉलिवूड सिंगर रिहानावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिहानाच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं आहे. ७०व्या वर्षी रिहानाचे वडील रोनाल्ड फेंटी यांचं निधन झालं आहे. शनिवारी(३१ मे) सकाळी लॉस अॅजिंल्स येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते अशी माहिती मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच रिहानाचा भाऊ राजद फेंटीने वडिलांची भेट घेतली होती. लॉस अॅजेंलिसमधील सीडर-सिनाई मेडिकल सेंटरमध्ये तो वडिलांना भेटण्यासाठी गेला होता. वडिलांच्या निधनावर अद्याप रिहानाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. रिहाना आणि तिच्या वडिलांच्या नात्यात गेल्या काही वर्षांपासून दुरावा आला होता. २०१९ मध्ये रिहानाने तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला होता. परवानगीशिवाय फेंटी एंटरटेनमेंट कंपनीचं नाव वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.
रिहानाच्या वडिलांच्या निधनावर बारबाडोसच्या प्रधानमंत्री मिया मोटली यांनी शोक व्यक्त केला आहे. "ही दु:खद बातमी आहे. बारबाडोसचं सरकार आणि जनतेतर्फे मी रिहाना फेंटीचे वडील रोनाल्ड फेंटी यांच्या निधनावर संवेदना व्यक्त करतो. रिहानाच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. मात्र, त्यांनी अनेक लोकांना प्रभावित केलं आहे", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.