अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 10:28 IST2025-06-06T10:25:23+5:302025-06-06T10:28:42+5:30

प्रियंका चोप्रा बहुचर्चित 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Heads Of State Final Trailer Priyanka Chopra's Mi6 Agent Noel Bisset Steals The Show In Idris Elba-john Cena Film | अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका, प्रियंका चोप्राच्या 'हेड ऑफ स्टेट' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Heads Of State Final Trailer: प्रियंका चोप्रा आज बॉलिवूडसह हॉलिवूडमधील लोकप्रिय चेहरा आहे. आज अभिनेत्री सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. प्रियंकाच्या चाहत्यांना तिच्या चित्रपटाची फारच उत्सूकता असते. गेल्या काही दिवसांपासून तिच्या  'हेड ऑफ स्टेट' सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू होती.  विशेष म्हणजे या चित्रपटात प्रियंका जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत काम केलंय.  त्यामुळे हा चित्रपट पाहण्यासाठी चाहेत उत्सुक आहेत. आता अखेर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये प्रियंकाचा अ‍ॅक्शन अवतार पाहायला मिळाला असून चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. 

२ मिनिट ४६ सेकंदांच्या ट्रेलरमध्ये दिसतंय की ब्रिटनचे पंतप्रधान सॅम क्लार्क (इद्रिस एल्बा) आणि अमेरिकेचे अध्यक्ष विल डेरिंगर (जॉन सीना) हे एका संकटात सापडतात आणि मग प्रियंकाची एन्ट्री होती. ती प्रियंका एक शांत, तीक्ष्ण, चपळ एजंटच्या भुमिकेत दिसतेय. अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. 

'देसी गर्ल'चा हॉलिवूड अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार नाही, तर थेट ओटीटीवर येतोय. हा चित्रपट २ जुलै २०२५ रोजी  ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाईल. ट्रेलरमध्ये दिसत असेलल्या अ‍ॅक्शन सीन्ससाठी प्रियंकानं प्रचंड मेहनत घेतली होती. चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं, तेव्हा तिनं अनेकदा जखमी झाल्याचं फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट दिलं होतं. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो यशस्वी ठरणार, यात शंका नाही. 

Web Title: Heads Of State Final Trailer Priyanka Chopra's Mi6 Agent Noel Bisset Steals The Show In Idris Elba-john Cena Film