वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 10:39 IST2025-08-06T10:37:55+5:302025-08-06T10:39:06+5:30
प्रसिद्ध अभिनेत्रीला वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे

वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, समोर आलं मोठं कारण
मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. अमेरिकन टीव्ही अभिनेत्री केली मॅक हिचं नुकतंच निधन झालं आहे. ती केवळ ३३ वर्षांची होती. ‘द वॉकिंग डेड’ या लोकप्रिय चित्रपटाच्या सीरिजमधून तिला कमालीची ओळख मिळाली. मॅक गेल्या वर्षभरापासून मेंदूच्या दुर्मिळ कर्करोगाशी झुंज देत होती. २ ऑगस्ट रोजी अमेरिकेतील सिसिनाटी, ओहायो इथं राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. केलीच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.
केली मॅकचं निधन
केली मॅक हिला ‘डिफ्यूज मिडलाईन ग्लायोमा’ नावाचा दुर्मिळ आणि अत्यंत घातक प्रकारचा मेंदूचा कर्करोग झाला होता. बायोप्सीनंतर तिच्या शरीरावर गंभीर परिणाम झाले आणि ती चालू शकत नव्हती. व्हीलचेअरच्या साहाय्याने ती आयुष्य जगत होती. तरीही तिने हिम्मत सोडली नाही आणि अखेरपर्यंत सकारात्मक राहण्याचा प्रयत्न केला.केलीने ‘द वॉकिंग डेड’ मालिकेत ‘एडी’ ही भूमिका सकारली होती. याशिवाय ‘शिकागो मेड’, ‘9-1-1’, ‘डेलिकेट आर्क’ यांसारख्या चित्रपट, वेबसीरिजमध्ये तिने भूमिका साकारली.
‘युनिव्हर्सल’ या २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात ती शेवटचं झळकली होती. तिने अभिनेत्री म्हणून ३५ प्रोजेक्ट्स आणि निर्मात्याच्या भूमिकेत ५ प्रोजेक्ट्स पूर्ण केले होते. ती हेली स्टेनफील्डसाठी ‘स्पायडरमॅन : इन्टू द स्पायडरव्हर्स’ मध्ये व्हॉइस डबल म्हणूनही काम करत होती. केलीच्या कुटुंबीयांनी तिच्या निधनाची माहिती दिली असून ८ ऑगस्ट रोजी सिसिनाटीमध्ये तिची शोकसभा आयोजित केली जात आहे. तिच्या अकाली जाण्यामुळे हॉलीवूडमधील कलाकार मंडळींसह चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.