Emmys 2018: एमी अवार्डच्या मंचावर रंगला ‘प्रेमसोहळा’! 57 वर्षांच्या दिग्दर्शकाने गर्लफ्रेन्डला केले प्रपोज!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 18:00 IST2018-09-18T17:58:38+5:302018-09-18T18:00:44+5:30
यंदाचा 70 वा एमी अवार्ड्स2018 चर्चेचा विषय ठरतो आहे. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सोहळ्यात निर्माता दिग्दर्शक ग्लेन वीस यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार घ्यायला ग्लेन मंचावर आलेत आणि यानंतर त्यांनी जे काही केले, ते पाहून सगळेच अवाक् झालेत.

Emmys 2018: एमी अवार्डच्या मंचावर रंगला ‘प्रेमसोहळा’! 57 वर्षांच्या दिग्दर्शकाने गर्लफ्रेन्डला केले प्रपोज!!
यंदाचा 70 वा एमी अवार्ड्स2018 चर्चेचा विषय ठरतो आहे. या सोहळ्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या सोहळ्यात निर्माता दिग्दर्शक ग्लेन वीस यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार घ्यायला ग्लेन मंचावर आलेत आणि यानंतर त्यांनी जे काही केले, ते पाहून सगळेच अवाक् झालेत. ग्लेन यांनी बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार घेतला आणि यानंतर भाषणात चक्क आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज केले. होय, एमी अवार्ड्सच्या मंचावर 57 वर्षांच्या ग्लेन यांनी गर्लफ्रेन्ड जेन स्वेंडसन हिला प्रपोज केले. त्यांचा तो अंदाज पाहून प्रत्येकजण दंग राहिला.
SHE SAID YES!💍 Watch the evening's most heartwarming moment. #Emmyspic.twitter.com/1ByFtnSpig
— NBC Entertainment (@nbc) September 18, 2018
जेन, तू माझे प्रेम आहे. आयुष्यातील प्रकाश हरवू देऊ नकोस, असे माझी आई मला नेहमी सांगायची. जेन, तूच प्रकाश बनून माझ्या आयुष्यात आली आहेस. मला तुला गर्लफ्रेन्ड म्हणणे अजिबात आवडत नाही. कारण तुला मी माझी पत्नी बनवू इच्छितो. ही रिंग माझ्या वडिलांनी माझ्या आईला घातली होती. आज सर्वांसमोर, माझी आई आणि तुझ्या आई-वडिलांसमोर जे आपल्याला स्वर्गातून बघत आहेत, त्याच्यासमक्ष ही रिंग तुला देऊ इच्छितो. तू माझ्याशी लग्न करशील? अशा रोमॅन्टिक अंदाजात त्यांनी जेनला प्रपोज केले. ग्लेनचा हा रोमॅन्टिक अंदाज पाहून जेन भावूक झाली नसेल तर नवल...