Brooke Shields: या अभिनेत्रीवर करण्यात आला होता रेप, अनेक वर्ष गप्प राहिल्यानंतर आता केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 10:38 AM2023-01-23T10:38:52+5:302023-01-23T10:39:48+5:30

Brooke Shields Documentary: जगभरात ओळख मिळवणारी ब्रूक शील्ड्सवर दोन भागात प्रिटी बेबीः ब्रूक शील्ड्स डॉक्युमेंट्री तयार केली गेली. ही नुकतीच सनडान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली. ही ओटीटी प्लेटफॉर्म हुलूलूवर याचवर्षी रिलीज होईल. 

Brooke Shields documentary : Hollywood actress told that she raped by man known to her in hotel room | Brooke Shields: या अभिनेत्रीवर करण्यात आला होता रेप, अनेक वर्ष गप्प राहिल्यानंतर आता केला खुलासा

Brooke Shields: या अभिनेत्रीवर करण्यात आला होता रेप, अनेक वर्ष गप्प राहिल्यानंतर आता केला खुलासा

googlenewsNext

Actress Rape : प्रसिद्ध अमेरिकन सुपर मॉडल आणि हॉलिवूड अभिनेत्री ब्रूक शील्ड्सने तिच्या जीवनावर आधारीत डॉक्युमेंट्रीमध्ये असा खुलासा केला, ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले. केवळ 11 वर्षांची असताना  हॉलिवूड सिनेमात करणं आणि द ब्लू लगून (1980) सारख्या सिनेमातून जगभरात ओळख मिळवणारी ब्रूक शील्ड्सवर दोन भागात प्रिटी बेबीः ब्रूक शील्ड्स डॉक्युमेंट्री तयार केली गेली. ही नुकतीच सनडान्स फिल्स फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आली. ही ओटीटी प्लेटफॉर्म हुलूलूवर याचवर्षी रिलीज होईल. 

57 वर्षीय ब्रूक शील्ड्सने सांगितलं की, चाइल्ड आर्टिस्ट म्हणून फेम मिळवल्यानंतर जेव्हा ती मोठी झाली आणि तिने उच्च शिक्षण घेतलं तेव्हा ती पुन्हा सिनेमात काम मिळवण्याच्या प्रयत्नात होती. यादरम्यान तिला एक जुनी ओळखीची व्यक्ती भेटली. तो तिला हॉटेल रूममध्ये घेऊन गेला. तो म्हणाला होता की, तो तिला हॉटेलवरून टॅक्सी करून देईल. 

डॉक्युमेंट्रीमध्ये ब्रूक शील्ड्स म्हणाला की, हॉटेलच्या रूममध्ये पोहोचल्यानंतर ती व्यक्ती बाथरूममध्ये गेली आणि बऱ्याच वेळाने बाहेर आली. त्याच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. त्याने माझ्यावर उडी घेतली. ती म्हणाली की, 'मला वाटलं की, तो माझ्यासोबत कुस्ती खेळत आहे. माझ्या श्वास गुदमरला होता. मी त्याला रोखू शकले नाही. मी रोखूच शकत नव्हते. मला वाटलं की, मी बर्फासारखी गोठली आहे. मला वाटत होतं की, मी कशीतरी जिवंत वाचली पाहिजे आणि तिथून गेले पाहिजे'.

शील्ड्सने डॉक्युमेंट्रीमध्ये पुढे सांगितलं की, 'जेव्हा मी तिथून बाहेर निघाले आणि आपल्या मैत्रिणीला फोन केला. तिला मी हॉटेलमध्ये घडलेलं सगळं सांगितलं. ती म्हणाली की, त्याने तुझ्यासोबत रेप केला'. शीड्ल्सने सांगितलं की, मला तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा नव्हता आणि हेच कारण होतं की, इतकी वर्ष मी गप्प बसून होते. मी कुणासोबतही या घटनेबाबत बोलले नव्हते. 

दरम्यान ब्रूक शील्ड्सने डॉक्युमेंट्रीमध्येही सांगितलं नाही की, तिच्या ओळखीची ती व्यक्ती कोण होती. त्याचं नाव काय होतं. ज्याने तिच्यावर रेप केला होता. ब्रूक शील्ड्सच्या या खुलाशाने जगभरातील तिच्या फॅन्सना धक्का बसला आहे. एकेकाळी जगातल्या सगळ्यात सुंदर महिलांमध्ये गणली जाणाऱ्या ब्रूक शील्ड्सने 1997 मध्ये अमेरिकन टेनिस स्टार आंद्रे अगासीसोबत लग्न केलं होतं. पण दोन वर्षे सुद्धा सोबत राहिले नाही आणि 1999 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.

Web Title: Brooke Shields documentary : Hollywood actress told that she raped by man known to her in hotel room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.