अखेर ब्रॅड पिट-अँजोलिना जॉलीचा झाला घटस्फोट, ८ वर्षांपासून सुरू होते कायदेशीर वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:42 IST2024-12-31T16:41:42+5:302024-12-31T16:42:36+5:30

Brad Pitt-Angelina Jolie Divorce: हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट आणि अँजोलिना जॉली यांचा अखेर घटस्फोट झाला आहे. दोघेही आठ वर्षे कायदेशीर लढा देत होते. आता त्यांनी हे प्रकरण मिटवले आहे.

Brad Pitt-Angelina Jolie finally divorce, legal dispute started for 8 years | अखेर ब्रॅड पिट-अँजोलिना जॉलीचा झाला घटस्फोट, ८ वर्षांपासून सुरू होते कायदेशीर वाद

अखेर ब्रॅड पिट-अँजोलिना जॉलीचा झाला घटस्फोट, ८ वर्षांपासून सुरू होते कायदेशीर वाद

हॉलिवूड स्टार ब्रॅड पिट (Brad Pitt) आणि अँजोलिना जॉली (Angelina Jolie) आठ वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर घटस्फोट घेत आहेत. दोघांनी घटस्फोटाचा करार अंतिम केला आहे. 'व्हेरायटी' रिपोर्टनुसार, हॉलिवूड जोडप्याने त्यांच्या अटींना अंतिम रूप दिले आणि ३० डिसेंबर रोजी विभक्त होण्याच्या अटींवर स्वाक्षरी केली.

अभिनेत्री अँजोलिना जॉलीचे वकील जेम्स सायमन म्हणाले की, आठ वर्षांपूर्वी अँजोलिनाने मिस्टर पिटपासून घटस्फोटासाठी अर्ज केला होता. जॉलीने १९ सप्टेंबर २०१६ रोजी पिटपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. तिने आणि मुलांनी मिस्टर पिटसोबत शेअर केलेली सर्व मालमत्ता सोडून दिली आहे. तिचे लक्ष आता कुटुंब आणि शांततेवर आहे. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आठ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या दीर्घ प्रक्रियेचा हा फक्त एक भाग आहे. खरे सांगायचे तर, अँजोलिना थकली होती, पण आता तिची यातून सुटका झाली आहे म्हणून तिला आराम मिळाला आहे.

२०१६ मध्ये  दोघांमधील भांडण आलं होतं चर्चेत

'व्हेरायटी'नुसार, दोघांमधील भांडण २०१६ मध्ये चर्चेत आले होते, जेव्हा एका खाजगी विमानात कथितरित्या शारीरिक झटपट झाली होती, जिथे पिटने कथितपणे त्याच्या एका मुलाचा गळा दाबला होता आणि दुसऱ्याच्या तोंडावर थापड मारली होती. ही बातमी ‘पीपल’ मासिकाने सर्वप्रथम दिली होती. असाही दावा करण्यात आला होता की, जॉलीला इजा करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पिटविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर दोघांमधील वाद आणखी वाढला.

अँजोलिना जॉलीसाठी मातृत्व महत्त्वाचं

हॉलिवूड अभिनेत्री अँजोलिना जॉलीने अलीकडेच सांगितले की तिच्यासाठी मातृत्वाशिवाय इतर काहीही महत्त्वाचे नाही; कारण ती तिची सहा मुले मॅडॉक्स, पॅक्स, झाहारा, शिलो आणि १६ वर्षांची जुळी मुले नॉक्स आणि व्हिव्हियन यांना समर्पित आहे. अभिनेत्री म्हणाली होती की, "मातृत्व हेच माझे सुख आहे. तू माझ्यापासून बाकी सर्व काही हिरावून घेऊ शकतेस... माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही."

Web Title: Brad Pitt-Angelina Jolie finally divorce, legal dispute started for 8 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.