हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 09:09 IST2024-11-12T09:06:38+5:302024-11-12T09:09:34+5:30

टॉम क्रूझसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने फोटो शेअर करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय

bollywood actress avneet kaur working with Tom Cruise in Mission Impossible 8 | हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल

हॉलिवूडच्या टॉम क्रूझसोबत दिसणार बॉलिवूडची अवनीत कौर? Mission Impossible 8 च्या सेटवरील फोटो व्हायरल

कालच Mission Impossible 8 चा ट्रेलर रिलीज झालाय. या ट्रेलरमध्ये टॉम क्रूझ पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. टॉम क्रूझच्या Mission Impossible 8 सेटवरील एक फोटो व्हायरल झालाय. हा फोटो दुसरी तिसरी कोणी नाही तर अभिनेत्री अवनीत कौरने शेअर केलाय. अवनीतने थेट हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता टॉम क्रूझसोबत फोटो शेअर केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. इतकंच नव्हे तर अवनीतला Mission Impossible 8 मध्ये काम करण्याची संधी मिळालीय असंही बोललं जातंय. 

अवनीत Mission Impossible 8 मध्ये दिसणार?

अवनीत कौरने सोशल मीडियावर  Mission Impossible 8 च्या सेटवरील टॉम क्रूझसोबतचा फोटो शेअर केलाय. या फोटोत अवनीतने टॉमसोबत  Mission Impossible 8 च्या सेटवर गप्पा मारल्या आणि त्याच्यासोबत फोटो काढले. हा फोटो शेअर केल्याने अवनीतला टॉम क्रूझच्या आगामी  Mission Impossible 8 मध्ये काम करण्याची संधी मिळाली असल्याची शक्यता आहे. अवनीतला  Mission Impossible 8 च्या सेटवर जाण्याची आणि टॉम क्रूझला भेटण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलंय. 


याआधीही Mission Impossible मध्ये दिसलेत बॉलिवूड कलाकार

हॉलिवूडच्या टॉम क्रूझची प्रमुख भूमिका असलेली Mission Impossible फिल्म सीरिज ही गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या फेव्हरेट सीरिजपैकी एक आहे. पुढील वर्षी मे महिन्यात Mission Impossible 8 रिलीज होणार आहे. याआधी २०११ मध्ये रिलीज झालेल्या Mission Impossible 4 मध्ये प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर दिसले होते. त्यामुळे अवनीत Mission Impossible 8 मध्ये झळकणार की नाही याविषयी निश्चित माहिती समोर आली नसली तरीही पुढील वर्षी सिनेमा रिलीज झाल्यावरच याचा उलगडा होईल.

Web Title: bollywood actress avneet kaur working with Tom Cruise in Mission Impossible 8