हॉलिवूडच्या या स्टार कपलने केला साखरपुडा, लग्नाआधीच दिलेल्या अंगठीची किंमत वाचून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 17:31 IST2022-04-11T17:27:50+5:302022-04-11T17:31:41+5:30
Jennifer Lopez Ring : जेनिफरची अंगठी फारच महागडी असल्याचं बोललं जात आहे. जेनिफरची अंगठी ८.५ कॅरेट नॅच्युरल ग्रीन डायमंड सेंटर स्टोनची आहे.

हॉलिवूडच्या या स्टार कपलने केला साखरपुडा, लग्नाआधीच दिलेल्या अंगठीची किंमत वाचून व्हाल अवाक्
हॉलिवूड स्टार कपल जेनिफर लोपेज (Jennifer Lopez) आणि अभिनेता बेन एफ्लेक (Ben Affleck) ने आपल्या फॅन्सना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. या कपलने २० वर्षांनंतर पुन्हा एकदा साखरपुडा केला आहे. जेनिफरने एका व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना ह बातमी दिली. यात जेनिफरने तिची अंगठीही दाखवली आहे. या अंगठीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल.
जेनिफरची अंगठी फारच महागडी असल्याचं बोललं जात आहे. जेनिफरची अंगठी ८.५ कॅरेट नॅच्युरल ग्रीन डायमंड सेंटर स्टोनची आहे. डायमंड प्रो के सीईओ Mike Fried यांनी सिक्स पेजला दिलेल्या एका मुलाखतीत अंगठीच्या किंमतीबाबत खुलासा केला आहे. त्यांनी यावेळी अंगठीची अंदाजे किंमत सांगितली.
Major announcement!!!! https://t.co/G5oGxtX0z5pic.twitter.com/HTIqbHMJ2M
— jlo 💍 (@JLo) April 9, 2022
माइक (Mike Fried) ने सांगितलं की या साइजचा ग्रीन डायमंड फारच मौल्यवान असतो आणि यासमोर जेनिफरच्या आधीच्या अंगठीची किंमत काहीच नाही. या अंगठीची किंमत अंदाजे ५ मिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. पण ते असंही म्हणाले की, या अंगठीची किंमत १० मिलियन डॉलरही असू शकते.
जेनिफरच्या या अंगठीची किंमत भारतीय करन्सीनुसार लावली तर ५ मिलियन डॉलर्सच्या हिशेबाने ही ३७ कोटी रूपयांची होईल. ते १० मिलियन डॉलर्सच्या हिशेबाने बघितलं तर या अंगठीची किंमत जवळपास ७६ कोटी रूपये असू शकते. जेनिफरचं हिरव्या रंगावर विशेष प्रेम आहे. एका मुलाखतीत जेनिफरने सांगितलं होतं की, हिरवा रंग तिचा लकी रंग आहे. कदाचित हेच कारण असेल की, बेन एफ्लेकने तिला हिरव्या रंगाची डायमंडची अंगठी दिली.