Avengers Doomsday Teaser: कॅप्टन अमेरिका इज बॅक! बहुचर्चित 'ॲव्हेंजर्स डूम्सडे'चा पहिला टीझर रिलीज; स्टीव्ह रॉजर्सला पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 13:01 IST2025-12-24T12:53:44+5:302025-12-24T13:01:43+5:30
Avengers Doomsday Teaser: बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'ॲव्हेंजर्स डूम्सडे'चा टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे

Avengers Doomsday Teaser: कॅप्टन अमेरिका इज बॅक! बहुचर्चित 'ॲव्हेंजर्स डूम्सडे'चा पहिला टीझर रिलीज; स्टीव्ह रॉजर्सला पाहून चाहते थक्क
Avengers Doomsday Teaser: मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या (MCU) चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतिक्षित 'ॲव्हेंजर्स डूम्सडे' (Avengers: Doomsday) या चित्रपटाचा अधिकृत टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, यामध्ये कॅप्टन अमेरिका ऊर्फ 'स्टीव्ह रॉजर्स'च्या भूमिकेत ख्रिस इव्हान्स पुन्हा एकदा परतताना दिसत आहे.
कसा आहे टीझर?
१ मिनिट २१ सेकंदांच्या या टीझरची सुरुवात अतिशय भावनिक पद्धतीने करण्यात आली आहे. टीझरमध्ये स्टीव्ह रॉजर्स (ख्रिस इव्हान्स) आपल्या मोटारसायकलवरून घरी परतताना दिसतो आणि पार्श्वभूमीला एव्हेंजर्सची प्रसिद्ध संगीत वाजत आहे. यामध्ये कोणतेही मोठे ॲक्शन सीन्स दाखवण्यात आले नसले तरी, स्टीव्ह रॉजर्स आपला जुना 'कॅप्टन अमेरिका' सूट बाहेर काढताना आणि जुन्या आठवणीत हरवताना दिसत आहे.
ॲव्हेंजर्स डूम्सडे टीझर
टीझरमध्ये एक विशेष दृश्य आहे, ज्यामध्ये स्टीव्हच्या हातात एक लहान बाळ दिसत आहे. यावरून असे सूचित होते की, 'ॲव्हेंजर्स: एंडगेम'च्या घटनांनंतर स्टीव्हने स्वतःसाठी एक वेगळा आणि शांततेचा मार्ग निवडला आहे. ७ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर एव्हेंजर्सचा नवा भाग येत असल्याने चाहते खूप उत्साहात आहेत. सोशल मीडियावर "वेलकम बॅक स्टीव्ह रॉजर्स" अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे. ख्रिस इव्हान्ससोबतच या भागात ख्रिस हेम्सवर्थ देखील परतण्याची शक्यता आहे.
मार्वलच्या या एव्हेंजर्स या फ्रँचायझीचा पाचवा भाग 'ॲव्हेंजर्स डूम्सडे' १८ डिसेंबर २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधीच्या चार भागांनी (द एव्हेंजर्स, एज ऑफ अल्ट्रॉन, इन्फिनिटी वॉर आणि एंडगेम) बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित केले होते. आता ७ वर्षांनंतर येणारा हा चित्रपट देखील इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. आयर्न मॅन फेम रॉबर्ट डाऊनी ज्यु, या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.