‘झिरो’साठी ‘अॅक्वॉमॅन’ने बदलली रिलीज डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 15:10 IST2018-11-16T15:10:27+5:302018-11-16T15:10:58+5:30
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले असतानाच एक ताजी खबर आहे.

‘झिरो’साठी ‘अॅक्वॉमॅन’ने बदलली रिलीज डेट
बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खान याचा ‘झिरो’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाकडे प्रेक्षक डोळे लावून बसले असतानाच एक ताजी खबर आहे. होय, ‘झिरो’साठी जेसन मोमोआ आणि एम्बर हर्ड स्टारर ‘अॅक्वॉमॅन’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. होय, ‘झिरो’सोबतचा बॉक्सआॅफिस संघर्ष टाळण्यासाठी डीसी एक्सटेंडेड युनिव्हर्सने हा निर्णय घेतला.
शाहरुखचा ‘झिरो’ हा आगामी चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होतोय. ‘अॅक्वॉमॅन’ही याच दिवशी रिलीज होणार होता. पण आता ही रिलीज डेट बदलण्यात आली. आता ‘अॅक्वॉमॅन’ भारतात २१ डिसेंबरऐवजी येत्या १४ डिसेंबरला रिलीज होईल. ‘अॅक्वॉमॅन’च्या भूमिकेतील ‘झिरो’ हा पहिला सोलो रोल चित्रपट आहे. यापूर्वी तो ‘बॅटमॅन वुई सुपरमॅन डॉन आॅफ जस्टिस’ आणि ‘जस्टिस लीग’ यासारख्या चित्रपटात दिसला आहे.
‘अॅक्वॉमॅन’ भारतात इंग्रजी, हिंदी व तामिळ अशा तीन भाषांत रिलीज होणार आहे.डीसी एक्सटेंडेड युनिव्हर्सला आपल्या या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत. आत्तापर्यंत डीसी एक्सटेंडेड युनिव्हर्सने ‘वंडर वूमन’ हा केवळ एकच हिट दिला आहे.