अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 12:52 IST2020-06-21T12:49:22+5:302020-06-21T12:52:57+5:30

अँजेलिना जोली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. पाठोपाठ दोघांनी घटस्फोटही घेतला. 

Angelina Jolie Explains Why She Separated From Brad Pitt | अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण

अँजेलिना जोलीचा खुलासा; चार वर्षांनंतर सांगितले ब्रॅड पिटसोबत घटस्फोट घेण्याचे कारण

ठळक मुद्दे2014 साली ब्रॅड व अँजेलिना विवाहबंधनात अडकले होते. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.

अँजेलिना जोली व ब्रॅड पिट ही हॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी 2016 साली विभक्त झाली. पाठोपाठ दोघांनी घटस्फोटही घेतला. खरे तर घटस्फोटाच्या दोनच वर्षे आधी दोघांनी लग्न केले होते.
आमच्यात तणाव निर्माण झाला असून आमचे संबंध सुधारण्यापलीकडे गेले आहेत, इतकेच काय ते घटस्फोटाची घोषणा करताना अँजेलिनाने सांगितले होते. आता घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर अँजेलिना या तणावांच्या कारणांवर खुलेपणाने बोलली आहे. मी माझ्या व माझ्या मुलांच्या भल्यासाठी ब्रॅड  पिटपासून वेगळे झाले, असे तिने म्हटले आहे.

वोग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती यावर बोलली. ती म्हणाली, ‘मी माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी बॅडपासून विभक्त झाले़.हा एक योग्य निर्णय होता. मी एकटी माझ्या मुलांची काळजी घेऊ शकते. काही लोकांनी माझ्या चुप्पीचा लाभ घेतला आणि माझ्या मुलांनीही त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या ऐकल्या. पण यानंतर मी मुलांना समजावले. तुम्ही सत्य काय ते जाणता, हे मी त्यांना सांगितले.’


यापूर्वी हार्पर बाजार या मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीतही अँजेलिनाने असेच काही खुलासे केले होते. गेली काही वर्षे मी शारीरिक, मानसिकदृष्ट्या बरेच काही भोगले. या वेदनांचे अनेक व्रण माझ्या शरीरावर आहेत. ब्रॅडला लागलेले दारूचे व्यसन आणि माझ्या यशाबद्दल वाटत असलेली ईर्षा या कारणाने मी त्याच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्याला याच कारणाने हॉलिवूडमधील चांगल्या संधी गमवाव्या लागल्या होत्या, असे अँजेलिनाने सांगितले होते.

अँजेलिनाआणि ब्रॅड  2005 पासून एकत्र होते.  मिस्टर अँड मिसेस स्मिथ  आणि  बाय द सी  या चित्रपटात ते एकत्र दिसले. त्यांची  केमिस्ट्री चाहत्यांनी भावली. त्यांच्या नात्याची चर्चा हॉलिवूडमध्ये बराच काळ चालली. अखेर नऊ वर्षांनंतर 2014 साली ब्रॅड व अँजेलिना विवाहबंधनात अडकले होते. पण त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. त्यांनी लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच वेगळे होण्याचा निर्णय घेतला.  
 
45 वर्षांची अँजेलिना व ब्रॅड पिट यांना 6 मुलं  आहेत. मॅडॉक्स, पॅक्स, जहरा, शिलोह, नॉक्स आणि विवियन अशी या मुलांची नावे आहेत.

Web Title: Angelina Jolie Explains Why She Separated From Brad Pitt