प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:19 IST2025-06-02T17:18:55+5:302025-06-02T17:19:19+5:30

Devin Harjes Death: अमेरिकन टीव्ही अभिनेता डेव्हिन हार्जेस याचं निधन झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला.

american tv actor devin harjes dies at 41 daignosed with cancer in february | प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

प्रसिद्ध अभिनेत्याचं ४१व्या वर्षी निधन, फेब्रुवारी महिन्यातच झालेलं कॅन्सरचं निदान

हॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अमेरिकन टीव्ही अभिनेता डेव्हिन हार्जेस (Devin Harjes) याचं निधन झालं आहे. ४१ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. २७ मे रोजी डेव्हिनने या जगाचा निरोप घेतला. त्याच्या ऑफिशियल वेबसाइटवरुन डेव्हिनच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. त्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

डेव्हिनला फेब्रुवारी महिन्यात कॅन्सरचं निदान झालं होतं. त्याच्यावर न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई वेस्ट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यामागे आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे. त्याच्या निधनाने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

डेव्हिन हार्जेसचा जन्मा २९ जुलै १९८३ रोजी टेक्सासमध्ये झाला होता. अनेक सुपरहिट टीव्ही सीरिजमध्ये त्याने काम केलं होतं. 'ब्रॉडवॉक एम्पायर', 'डेअरडेव्हिल', 'गोथम' यांसारख्या टीव्ही सीरिजमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. मॅनिफेस्ट या नेटफ्लिक्सवरील सायन्स फिक्शन सीरिजमध्येही तो दिसला होता. 'ब्लू ब्लड्स', 'ऑरेंज इज द न्यू ब्लॅक', 'एलिमेंटरी', 'एफबीआय' या टीव्ही सीरिजमध्ये तो झळकला होता. 

Web Title: american tv actor devin harjes dies at 41 daignosed with cancer in february

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.