61 वर्षांची गायिका करतेय 25 वर्षांच्या डान्सरला डेट, नव्या वर्षात अडकणार लग्नाच्या बेडीत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2020 12:31 IST2020-01-01T12:23:15+5:302020-01-01T12:31:25+5:30
दोघांच्या वयात 36 वर्षांचे अंतर असले तरी मुलाच्या कुटुंबीयांने ते मान्य आहे.

61 वर्षांची गायिका करतेय 25 वर्षांच्या डान्सरला डेट, नव्या वर्षात अडकणार लग्नाच्या बेडीत?
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या पेक्षा 10 वर्षांनी लहान निक जोनसला डेट करत असल्याचे ज्यावेळी जगासमोर आले होते. त्यावेळी अनेक चर्चा झाल्या होत्या. अर्थात असे पहिल्यांदा झाले नव्हते. याआधी असे अनेक वेळा झाले आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार अमेरिकेतील प्रसिद्ध सिंगर मॅडोना स्वत: पेक्षा अनेक वर्षांनी लहान असलेल्या मुलाला डेट करते आहे. अहलमलिक विलियम्स नावाच्या डान्सरला ती डेट करते आहे.
मॅडोनाचे वय आता 61 वर्षे आहे तर तिच्या बॉयफ्रेंड 25 वर्षांचा आहे. रिपोर्टनुसार विलियम्सच्या वडिलांनी सांगितले की मॅडोनाने आधीच सांगितले आहे की तिचं विलियम्सवर प्रेम आहे. आजतकच्या रिपोर्टनुसार टीएमजेड दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, विलियम्सने जेव्हा मडोनाला डेट करायला सुरुवात केले त्यावेळी मी तिला भेटलो. पुढे त्यांनी हे देखील सांगितले दिवसांदिवस त्यांचे नातं आणखी गडद होत चालले आहे.
लास वेगासमध्ये एका शोनंतर मॅडोनाने विलियम्सच्या आई-बाबांना डिनरसाठी देखील बोलवले होते. विलियम्सच्या वडिलांना मुलाच्या 36 वर्षांनी मोठ्या असलेल्या गर्लफ्रेंडसोबतच्या नात्याबाबत कोणतीच तक्रार नाही.
मॅडोना अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मॅडोना चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील ती खूप अॅक्टिव्ह असते. आपल्या शो दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या फॅन्ससोबत सतत शेअर करत असते. तिचे फॅन्सदेखील तिच्या फोटो आणि व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.