वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:27 IST2025-10-29T17:27:24+5:302025-10-29T17:27:48+5:30
Keelsey Grammer News: हॉलिवूडमधील प्रसिद्ध टीव्ही स्टार केल्सी ग्रामर हे वयाच्या सत्तराव्या वर्षी वडील बनले आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ७० वर्षांचे झालेले केल्सी ग्रामर यांनी चीयर्स आणि फ्रेजयर सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.

वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
हॉलिवूडमधील प्रसिद्ध टीव्ही स्टार केल्सी ग्रामर हे वयाच्या सत्तराव्या वर्षी वडील बनले आहेत. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात ७० वर्षांचे झालेले केल्सी ग्रामर यांनी चीयर्स आणि फ्रेजयर सारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. दरम्यान ग्रामर यांनी पॉड मीट्स वर्ल्ड या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, मी आणि माझी पत्नी केट वॉल्श यांनी आपल्या चौथ्या मुलाचं स्वागत केलं आहे. तर ग्रामर यांचं हे एकूण आठवं अपत्य आहे.
केल्सी ग्रामर या पॉडकास्टदरम्यान सांगितलं की, आम्ही हल्लीच आपल्या चौथ्या बाळाचं स्वागत केलं आहे. आथा आमचं कुटुंब आठ अपत्यांचं बनलं आहे. आमच्या आठव्या मुलाचं नाव क्रिस्टोफर आहे. आमचा मुलगा कार्यक्रमाचं चित्रिकरण होण्यापूर्वी तीन दिवस आधी जन्मला आहे. आता आमच्याकडे वेगवेगळ्या वयोगटातील मुलांचा समूह आहे, असे या पॉडकास्टदरम्यान, केल्सी ग्रामर यांनी गमतीने सांगितले.
केल्सी ग्रामर आणि केट वॉल्श यांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं. या दाम्पत्याला आधी एक मुलगी आणि दोन मुलगे होते. आता त्यांच्या कुटुंबात आणखी एका मुलग्याचं आगमन झालं आहे. हे दाम्पत्य पुन्हा आई-वडील बनणार असल्याचं एका मासिकाने जून महिन्यात सांगितलं होंत. तसेच लंडनमध्ये फिरतानाचे फोटो व्हायरल झाले होते. दरम्यान, केट वॉल्श ही केल्सी ग्रामर यांची चौथी पत्नी आहे. यापूर्वी त्यांनी डान्सर आणि मॉडेल केमिल डोनाटाची हिच्याशी लग्न केलं होतं. तर तिच्या आधी ली-ऐन चुहानी आणि त्याआधी डोरिन एल्डरमेन हिच्यासोबत लग्न केलं होतं. केल्सी ग्रामर यांना आधी एकूण सात मुले होती. त्यापैकी सर्वात मोठी मुलगी स्पेंसर ग्रामर ही आहे. ती अभिनेत्री आहे.