Shocking! 'मिशन इम्पॉसिबल'च्या अभिनेत्याकडून शूटींगदरम्यान चुकून झाडली गेली गोळी, सेटवर सिनेमटोग्राफरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 14:12 IST2021-10-22T14:11:27+5:302021-10-22T14:12:29+5:30
अभिनेता एलेक बाल्डविनने आपल्या आगामी 'रस्ट' सिनेमाच्या सेटवर चुकून गोळी चालवली. खास बाब म्हणजे ही घटना त्या बंदुकीमुळे झाली जिचा वापर सिनेमात केला जात होता.

Shocking! 'मिशन इम्पॉसिबल'च्या अभिनेत्याकडून शूटींगदरम्यान चुकून झाडली गेली गोळी, सेटवर सिनेमटोग्राफरचा मृत्यू
सिनेमात अनेकदा तुम्ही असा सीन पाहिला असेल एखाद्या व्यक्तीकडून चुकून गोळी चालली आणि एखाद्या व्यक्तीचा जीव गेला. पण नुकतीच एक खरी घटना एका सिनेमाच्या सेटवर घडली. ज्यात अभिनेत्याने सेटवर चुकून गोळी झाडली आणि गोळी थेट सिनेमटोग्राफरला जाऊन लागली. ज्यामुळे त्याा मृत्यू झाला. इंटरनॅशनल स्टार एलेक बाल्डविनने (Alec Baldwin) शूटींग दरम्यान आपल्या क्रू मेंबर्सचा जीव घेतला. इतकंच नाही या सिनेमाचे दिग्दर्शकही या घटनेत जखमी झाले.
अभिनेता एलेक बाल्डविनने आपल्या आगामी 'रस्ट' सिनेमाच्या सेटवर चुकून गोळी चालवली. खास बाब म्हणजे ही घटना त्या बंदुकीमुळे झाली जिचा वापर सिनेमात केला जात होता. सिनेमाच्या सेटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'रस्ट' सिनेमाचं शूटींग न्यू मेक्सिकोच्या सांता फे मध्ये बोनान्जा क्रीक रेंचमध्ये सुरू होती. पण गुरूवारीच सेटवर ही घटना घडली. या घटने सिनेमटोग्राफर हलिना हचिन्सचा मृत्यू झाला. हेचिन्सचं वय ४२ वर्ष होतं. त्यासोबतच सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक ४८ वर्षीय जोएल सूजाही या घटनेदरम्यान जखमी झाले.
याप्रकरणी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी सांगितलं की, या घटनेबाबत अजून कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पण घटनेची चौकशी सुरू आहे. हे स्पष्ट नाही झालं की, प्रॉप गनमध्ये गोळ्या का भरल्या होत्याय. सध्या या प्रकरणावरून बाल्डविन, सूजा आणि 'रस्ट' सिनेमाचे निर्माते काहीही बोलले नाहीत.