"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 13:10 IST2025-06-04T12:25:03+5:302025-06-04T13:10:05+5:30
RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना; म्हणाला-"१८ वर्षांची निष्ठा..."

"१८ वर्षांची निष्ठा...", RCB च्या विजयानंतर टीव्ही अभिनेत्याची विराटसाठी पोस्ट, म्हणाला- "त्याचे अश्रू..."
Aly Goni Post For Virat Kohli : आयपीएलच्या (IPL 2025) स्पर्धेतला लोकप्रिय आणि प्रचंड चाहतावर्ग असलेल संघ अशी ओळख असलेला संघ म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बॅगलुरू (Royal Challengers Bengaluru). बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर यंदाच्या १८ व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बॅगलुरूच्या संघाचं जेतेपदाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. तर पंजाबचा संघ अहमदाबादच्या मैदानावर १९१ धावाचं लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला. शिवाय काल झालेल्या अंतिम लढतीत बंगळुरु संघाने विजेतेपदाला गवसणी घातली आहे. दरम्यान, संपूर्ण देशभरातून च्या टीमचं कौतुक होताना दिसत आहे. मराठीसह कलाविश्वासह अनेक सेलिब्रिटी मंडळी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
आरसीबीच्या विजयानंतर हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अली गोनीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत विराट कोहलीचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर ट्रोलकरणाऱ्यांना सुनावलं देखील आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावरविराट कोहलीचा व्हिडीओ शेअर करत लिहिलंय, "१८ वर्षांची निष्ठा, १८ सीझनची प्रतीक्षा..., ते हसले, त्यांनी शंका घेतली आणि त्यांनी थट्टा केली, पण आज किंग कोहलीने ट्रॉफी मिळवली जो तो डिसर्व्ह करतो आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रू हेच ट्रोलिंगचं उत्तर आहे." असं लिहून अभिनेत्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.अली गोनीच्या पोस्टवर बऱ्याच कलाकारांनी कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मागील १७ वर्षांत आरसीबीच्या संघाने ३ वेळा फायनल गाठली. पण तिन्ही वेळी धावांचा पाठलाग करताना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अन् ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. चौथ्या प्रयत्नात रजत पाटीदार या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विराट स्वप्न साकार केलं.