लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:19 IST2025-07-19T18:12:25+5:302025-07-19T18:19:17+5:30

बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आज बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटांमुळे नाही तर घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे.

Hansika Motwani getting divorced after three years of marriage? Her husband breaks silence on the discussion | लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन

लग्नाच्या तीन वर्षानंतर हंसिका मोटवानी घेतेय घटस्फोट? चर्चेवर तिच्या पतीनं सोडलं मौन

बालकलाकार म्हणून अभिनयात प्रवेश करणारी हंसिका मोटवानी (Hansika Motwani) आज बॉलिवूड आणि साउथ चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. पण सध्या ती तिच्या कोणत्याही चित्रपटांमुळे नाही तर घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. असे वृत्त समोर आले आहे की ही अभिनेत्री बऱ्याच काळापासून तिचा पती सोहेल कथुरियापासून वेगळी राहत आहे. दोघांच्या नात्यात कटुता आली आहे. आता ही अफवा पसरत असल्याचं पाहून अभिनेत्रीच्या पतीने यावर मौन सोडले. 

खरेतर हंसिका मोटवानी यांनी २०२२ मध्ये व्यावसायिक सोहेल कथुरियाशी लग्न केले. लग्नानंतर दोघेही सोहेलच्या पालकांसोबत नाही तर त्यांच्या इमारतीतील वेगळ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. जेणेकरून त्यांना एकांत मिळेल. मात्र, ही युक्ती दोघांनाही कामी आली नाही आणि त्यांचे नाते बिघडले.

हंसिका मोटवानी तिच्या पतीपासून राहतेय वेगळी?
न्यूज २४च्या रिपोर्ट्सनुसार, ही माहिती या जोडप्याच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की हंसिका सध्या सोहेलसोबत त्या फ्लॅटमध्ये राहत नाहीये, परंतु अभिनेत्री तिच्या आई वडिलांच्या घरी राहायला गेली आहे. त्यानंतर त्यांच्या वेगळे होण्याच्या चर्चेने आणखी जोर धरला. आता अभिनेत्रीच्या पतीने या अफवांवर आपले मौन सोडले आहे.

अभिनेत्रीच्या पतीने अफवांवर सोडलं मौन
सोहेल कथुरियाने अलीकडेच माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, "नाही, या वृत्तांमध्ये काहीही तथ्य नाही.." सोहेलच्या या विधानाने त्यांच्या वेगळे होण्याच्या आणि घटस्फोटाच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मात्र, सोहेलने त्यांचे विधान घटस्फोटाबद्दल होते की हंसिका वेगळे राहण्याबद्दल होते हे स्पष्ट केले नाही. 

Web Title: Hansika Motwani getting divorced after three years of marriage? Her husband breaks silence on the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.