फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

By Admin | Published: June 9, 2017 02:27 AM2017-06-09T02:27:05+5:302017-06-09T02:27:05+5:30

तमिळ अभिनेत्री फ्लोरा सैनी लवकरच ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

Flora in the Marathi film | फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

फ्लोरा झळकणार मराठी चित्रपटात

googlenewsNext

तमिळ अभिनेत्री फ्लोरा सैनी लवकरच ‘परी हूँ मैं’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे. फ्लोराने तमिळबरोबरच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. फ्लोराचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. रोहित शीलवंत दिग्दर्शित ‘परी हूँ मैं’ या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. टीव्ही अभिनेत्री ते यशस्वी चित्रपट अभिनेत्री असा एका अभिनेत्रीचा प्रवास दाखवण्यात आला आहे आणि ही भूमिका फ्लोरा साकारतेय. फ्लोराला तिच्या भूमिकेबाबत विचारले असता ती म्हणते की,‘या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आहे. आजकालच्या आयुष्यात येणारे चढ-उतार आणि त्यातून घडणाऱ्या गोष्टी त्या सुंदरपणे लिहिल्या आहेत. हा विषय इतका वेगळा आहे की, हा चित्रपट हिंदीमध्ये सुद्धा तयार करण्यात यावा, अशी माझी इच्छा आहे. यातली गोष्ट आपल्या आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आहे. या कुटुंबाचा मी पण एक भाग आहे.

Web Title: Flora in the Marathi film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.