फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:34 IST2025-09-13T09:33:05+5:302025-09-13T09:34:50+5:30
Abeer Gulaal: भारतात कधी रिलीज होणार सिनेमा?

फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
Abeer Gulaal Release in India: फवाद खान (Fawad Khan) आणि वाणी कपूरचा (Vaani Kapoor) 'अबीर गुलाल' सिनेमा आता भारतातही रिलीज होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर या सिनेमाच्या रिलीजला भारतात बंदी होती. एप्रिल मध्ये पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. यानंतर पाकिस्तानवर अनेकरित्या भारताने बंदी आणली होती. त्यातच तेथील कलाकारांचे सिनेमे भारतात रिलीज होणार नाहीत असाही निर्णय घेतला गेला होता. आता 'अबीर गुलाल'च्या भारतातील रिलीजला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
'अबीर गुलाल' सिनेमा काल १२ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला होता. मात्र भारतात अद्यार आलेला नाही. बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, फवाद आणि वाणी कपूरचा हा सिनेमा २६ सप्टेंबर रोजी भारतातील थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जगभरातील रिलीजच्या दोन आठवड्यांनंतर भारतात रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा सिनेमा साधी सरळ प्रेम कहाणी आहे. भारतासोबतच जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्याची क्षमता या सिनेमात आहे असा विश्वास मेकर्सने दाखवला आहे.
यावर्षी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणावाची परिस्थिती होती. मात्र आता एशिया कप क्रिकेट सामन्यात १४ सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना खेळावा ही परवानगी असेल तर सिनेमा रिलीज करायला काय हरकत आहे अशीही चर्चा झाली. यानंतर अखेर 'अबीर गुलाल' आता २६ सप्टेंबर रोजी भारतातही रिलीज होत आहे.
'अबीर गुलाल' सिनेमाची निर्मिती विवेक अग्रवाल, अवंतिका हरी, राकेश सिप्पी यांनी केलं आहे. अमित त्रिवेदीने सिनेमासाठी संगीत दिलं आहे. आरती बागडी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. गेल्या वर्षीच सप्टेंबर महिन्यात सिनेमाचं शूट लंडनमध्ये झालं होतं.