आहे का हिंमत? श्वेताने सोशल मीडियावर विचारला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 11:02 AM2024-05-23T11:02:38+5:302024-05-23T11:03:32+5:30

Shweta kharat: श्वेताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.

Do you dare? Shweta asked a direct question on social media | आहे का हिंमत? श्वेताने सोशल मीडियावर विचारला थेट सवाल

आहे का हिंमत? श्वेताने सोशल मीडियावर विचारला थेट सवाल

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता खरात (shweta kharat) हिने इंडस्ट्रीमध्ये तिचं हक्काचं  स्थान निर्माण केलं आहे. अगदी मोजक्या मालिकांमध्ये झळकलेल्या श्वेताने उत्तम अभिनयकौशल्य दाखवत प्रेक्षकांची मन जिंकली. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियावर श्वेताचा दांडगा वावर आहे. त्यामुळे ती वरचेवरच चाहत्यांच्या भेटीला येत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

श्वेता सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे. त्यामुळे ती कायम ट्रेंडिंग गाण्यावर रील्स शेअर करत असते. यात नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने 'ऐका दाजिबा'च्या गाण्यावर रील शेअर केलं आहे. या व्हिडीओमध्ये तिने जबरदस्त एक्स्प्रेशन्स दिले आहेत. विशेष म्हणजे यावेळी तिने व्हिडीओला दिलेलं कॅप्शन सर्वात जास्त चर्चिलं जात आहे.

'आहे हिंमत??' असा प्रश्न श्वेताने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विचारला आहे. सोबतच तिने मराठमोळा साजशृंगार केला आहे. या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिने या व्हिडीओमध्ये दिलेले एक्स्प्रेशन्स सध्या चर्चेत येत आहेत.

दरम्यान, श्वेताने  'मन झालं बाजिंद,' राजा रानीची गं जोडी' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यानंतर आता ती  'लाखात एक आमचा दादा' या नव्या कोऱ्या मालिकेत झळकणार आहे.

Web Title: Do you dare? Shweta asked a direct question on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.