बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शूटिंगदरम्यान अपघात, कामिनेनी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 15:49 IST2023-01-07T15:49:34+5:302023-01-07T15:49:45+5:30
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीचा शूटिंगदरम्यान अपघात, कामिनेनी रुग्णालयात दाखल
चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी त्याच्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला आहे. रोहित शेट्टी त्याच्या ड्रीम प्रोजेक्ट वेब सीरिज इंडियन पोलीस फोर्ससाठी शूटिंगचे काम सुरू होते या दरम्यान त्याचा अपघात झाला. कार चेस सिक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान रोहित शेट्टीच्या हाताला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यात त्याच्या हाताला दुखापत झाली, प्रॉडक्शन टीमने त्याला कामिनेनी रुग्णालयात दाखल केले आहे. रोहित शेट्टीच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
रोहित शेट्टी त्याच्या दमदार अॅक्शनसाठी चित्रपटांसाठी ओळखला जातो. रोहित शेट्टीच्या चित्रपटांमध्ये फाईट आणि अॅक्शन अतिशय फिल्मी स्टाईलमध्ये असतात. त्याच्या चित्रपटांमध्ये कार तसेच हेलिकॉप्टर्संचा वापर केला जातो. अनेक स्टंटही असतात. चित्रपटाच्या लूकवरूनच आपण ओळखू शकता की हा चित्रपट रोहित शेट्टीने बनवला आहे. याशिवाय रोहित शेट्टी टीव्ही शो खतरों के खिलाडीमध्येही बरेच स्टंट करतो आणि स्टार्संना करायला लावतो.
रोहित शेट्टी बॉलीवूडमध्ये त्याच्या शानदार अॅक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी ओळखला जातो. जरी 2022 हे वर्ष रोहित शेट्टीसाठी काही खास नसलं तरी 2023 मध्ये रोहित शेट्टी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सिरीज घेऊन येणार आहे. नुकताच प्रदर्शित झालेला रोहित शेट्टीचा सर्कस हा चित्रपट अपयशी ठरला. आता 2023 मध्ये, रोहित शेट्टी अजय देवगणच्या सिंघम 3, सिद्धार्थ मल्होत्राच्या इंडियन पोलिस फोर्स वेब सीरिज, सूर्यवंशी 2 आणि गोलमाल 5 सारख्या चित्रपट आणणार आहे.