शाहरुख खानने दिलीप कुमारांसोबतचा फोटो ट्विटरवर केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2018 13:38 IST2018-02-13T13:30:33+5:302018-02-13T13:38:12+5:30
दिलीप कुमार शाहरूखाला आपल्या मुलाप्रमाणे मानतात.

शाहरुख खानने दिलीप कुमारांसोबतचा फोटो ट्विटरवर केला शेअर
मुंबई: बॉलिवूड किंग शाहरूख खान याने सोमवारी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
शाहरूख खान आणि दिलीप कुमार यांच्यात पूर्वीपासूनच खास नाते आहे. दिलीप कुमार शाहरूखाला आपल्या मुलाप्रमाणे मानतात. त्यामुळे शाहरूख खान अधूनमधून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असतो.
.@iamsrk came to visit Saab at home today. -FF pic.twitter.com/GLrnqu1Ln2
— Dilip Kumar (@TheDilipKumar) February 12, 2018
सोमवारी शाहरूख त्यासाठीच दिलीप कुमार यांच्या घरी गेला होता. त्यानंतर शाहरूखने दिलीप कुमार यांच्यासोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला. या फोटोमध्ये शाहरूखने दिलीप कुमार यांचा हात पकडलेला दिसत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वी दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेव्हाही शाहरूख त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेला होता. दिलीप कुमार यांना किडनीचा आजार आहे. यामुळे त्यांना डायलिसिसवर ठेवण्याचा विचार डॉक्टर करत होते. पण दिलीप कुमार यांनी उपचाराला उत्तम प्रतिसाद दिल्याने त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. दिलीप कुमार ९४ वर्षांचे आहेत. गेल्या वर्षभरामध्ये वाढते वय आणि प्रकृती खालावल्याच्या कारणांमुळे दिलीप कुमार यांना बऱ्याचदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.