'धुरंधर' मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 14:51 IST2025-12-31T14:48:16+5:302025-12-31T14:51:00+5:30

४८ वर्ष जुनी हवेली! 'धुरंधर'मध्ये दाखवलेलं रेहमान डकैतचं घर कुठे आहे माहितीये? भारतातील 'या' शहरात झालं शूट 

dhurandhar rehman dakait lal kothi shown in the movie was not set its located in amritsar punjab | 'धुरंधर' मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

'धुरंधर' मध्ये दाखवलेली रेहमान डकैतची हवेली कुठेय माहितीये? 'या' ठिकाणी झालंय शूटिंग

Dhurandhar Movie: सध्या चित्रपटागृहांमध्ये  आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' (Dhurandhar) हा स्पाय थ्रिलर सिनेमा धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंगने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र, असं असूनही पडद्यावर रेहमान डकैत नावाच्या क्रूर गुंडाचं पात्र साकारून अक्षय खन्ना चांगलाच भाव खाऊन गेला आहे.  त्याच्या या दमदार अभिनयामुळे अभिनेता पुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये धुरंधर सोबतच या चित्रपटाविषयी आणखी काही गोष्टी जाणून घेण्यास उत्सुक झाले आहेत. धुरंधर चित्रपटाबरोबर अक्षय खन्नाने साकारलेल्या रेहमान डकैतची हवेली सुद्धा आता चर्चेचा विषय ठरली आहे. 

'धुरंधर' चित्रपटातील काही सीन्स हे पाकिस्तानातील कराची येथील असल्याचे दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे या चित्रपटातील शूटिंग लोकेशन्सबद्दल जाणून घेण्यास सर्वत्र कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले.निर्मात्यांनी हा चित्रपट बनवताना प्रत्येक गोष्टीवर बारीकाईने लक्ष दिलं आहे. चित्रपटात दाखवलेली रेहमान डकैतची हवेली देखील आकर्षण ठरली आहे. पण, तुम्हाला माहितीये का हे ठिकाण पाकिस्तानात नसून भारतातच आहे.

'या' ठिकाणी आहे रेहमान डकैतची हवेली...

धुरंधरमध्ये दाखवण्यात आलेली रेहमान डकैतची हवेलीला लाल कोठी असं म्हटलं जातं. ही लाल कोठी अमृतसर येथे आहे. या हवेलीचा रंग लाल असल्यामुळे तिला लाल कोठी हे नाव पडलं. गांधी आश्रमचे असिस्टंट सेक्रेटरी  बलविंदर सिंग यांनी बीबीसी हिंदी ला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे.  ही लाल कोठी गांधी आश्रम संस्थेच्या मालकीची आहे. साल १९७७-१९७८ च्या काळात त्यांनी ७ लाखांमध्ये ही कोठी खरेदी केली होती. त्याचबरोबर अनेक चित्रपटांचं शूटिंग देखील या ठिकाणी झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमध्ये असलेल्या इमारतीमध्ये खादी सामान देखील बनवलं जातं. हे ठिकाण पाहण्यासाठी दूर दूरवरून लोक येतात, धुरंधर सिनेमातील काही सीन्स याच ठिकाणी शूट करण्यात आले आहेत. या शूटिंगसाठी अक्षय खन्ना आणि इतर बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.

Web Title : 'धुरंधर' में रहमान डकैत की हवेली अमृतसर, भारत में है!

Web Summary : अक्षय खन्ना के 'धुरंधर' में रहमान डकैत की हवेली वास्तव में अमृतसर की 'लाल कोठी' है। यह गांधी आश्रम ट्रस्ट के स्वामित्व में है, जिसे 70 के दशक में खरीदा गया था, और यह फिल्मांकन स्थल और खादी उत्पादन स्थल के रूप में कार्य करता है।

Web Title : Rehman Dacoit's mansion in 'Dhurandhar' is in Amritsar, India!

Web Summary : Akshay Khanna's 'Dhurandhar' mansion, portraying Rehman Dacoit, is actually Amritsar's 'Lal Kothi'. It's owned by a Gandhi Ashram trust, purchased in the 70s, and serves as a filming location and Khadi production site.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.