कान्सच्या रेड कार्पेटवर नसणार दीपिका

By Admin | Updated: March 28, 2017 04:43 IST2017-03-28T04:43:55+5:302017-03-28T04:43:55+5:30

कॅटरिना कैफची ‘छुट्टी’ करून दीपिका पदुकोणने एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपद मिळवले

Deepika, who is not on Cannes's red carpet | कान्सच्या रेड कार्पेटवर नसणार दीपिका

कान्सच्या रेड कार्पेटवर नसणार दीपिका

कॅटरिना कैफची ‘छुट्टी’ करून दीपिका पदुकोणने एका इंटरनॅशनल कॉस्मेटिक ब्रँडचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपद मिळवले. आता या ब्रॅण्डशी कनेक्शन म्हणजे, कान्स फेस्टिवलला जायची संधी. येत्या १७ व १८ मे रोजी कान्स फिल्म फेस्टिवल होणार आहे. या ब्रँडमुळे दीपिका येत्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसणार, अशी शक्यता व्यक्त केली गेली. पण नाही, यंदा तरी दीपिका कान्सच्या रेड कार्पेटवर दिसणार नाहीयं.
एका अ‍ॅवार्ड फंक्शनमध्ये खुद्द दीपिकानेच हा खुलासा केला. फ्रान्सच्या कान्स शहरात रंगणाऱ्या या फेस्टिवलमध्ये जगभरातील चित्रपट व ग्लॅमर इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीज सामील होतात. बॉलिवूड अनेक वर्षांपासून या फेस्टिवलमध्ये सामील होत आले आहे. आधी ऐश्वर्या राय बच्चन आणि नंतर सोनम कपूर या फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर दिसत आल्या आहेत. यंदा ऐश्वर्या व सोनमसोबत दीपिकाही या रेडकार्पेटवर दिसेल, असे वाटले होते. पण दीपिकाने सगळ्यांचीच निराशा केली. मी कान्सला जात नाहीय. सध्या तरी मी माझे सगळे लक्ष ‘पद्मावती’वर केंद्रित केले आहे, असे तिने सांगितले. एकंदर काय तर संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’मुळे दीपिका कान्सला जाऊ शकणार नाहीय. कारण भन्साळी आपल्या स्टार्सला मुद्यावरून भरकटू देत नाहीत. कदाचित दीपिकालाही त्यांनी हाच सल्ला दिला असावा.

Web Title: Deepika, who is not on Cannes's red carpet