दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
By कोमल खांबे | Updated: October 22, 2025 08:43 IST2025-10-22T08:43:17+5:302025-10-22T08:43:43+5:30
दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या जोडप्याने लाडकी लेक दुआचा चेहरा दाखवला आहे. दीपिका आणि रणवीरने पहिल्यांदाच दुआसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत.

दीपिका पादुकोण-रणवीर सिंगने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा; लाडक्या दुआचे खास फोटो केले शेअर
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहेत. रणवीर-दीपिका गेल्यावर्षी आईबाबा झाले. ८ सप्टेंबर २०२४ रोजी दीपिकाने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या लाडक्या लेकीचं नाव दुआ असं ठेवलं आहे. रणवीर-दीपिकाच्या लेकीचा पहिला वाढदिवस नुकताच पार पडला. आता दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या जोडप्याने लाडकी लेक दुआचा चेहरा दाखवला आहे.
दीपिका आणि रणवीरने पहिल्यांदाच दुआसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. दिवाळीनिमित्त तिघांनीही खास लूक केल्याचं फोटोत दिसत आहे. रणवीरने कुर्ता परिधान केला आहे. तर दीपिकाने लेकीसह ट्विनिंग केल्याचं दिसत आहे. दीपिकाने लाल रंगाचा ड्रेस परिधान करत पारंपरिक लूक केला आहे. तर दुआनेही लाल रंगाचे कपडे घातल्याचं फोटोत दिसत आहे. हे फोटो शेअर करत या जोडप्याने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
या फोटोंवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत. या कमेंटमध्ये काहींनी दुआ ही हुबेहुब दीपिकासारखी दिसत असल्याचं म्हटलं आहे. दीपिका-रणवीरच्या दुआचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दुआच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.