'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:56 IST2025-05-21T15:55:38+5:302025-05-21T15:56:19+5:30
कपिल शर्मा शोमधील सर्वांचा लाडका व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेलंय. ही दुःखद बातमीने सर्व कलाकारांनी आणि शोच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे

'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
'द कपिल शर्मा शो'च्या सेटवरुन वाईट बातमी समोर येत आहे. या शोमध्ये दीर्घकाळ छायाचित्रकार म्हणून काम करणारे आणि दास दादा म्हणून सर्वांचं लाडके असणारे कृष्णा दास यांचे नुकतेच निधन झाले आहे. शोच्या टीमने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही दुःखद बातमी शेअर केली. दास दादा हे कपिल शर्मा शोमधील सर्वांचे लाडके होते. अनेकदा कपिलने त्यांना ऑन कॅमेरा लोकांसमोर आणलंय. याशिवाय त्यांची प्रेमाने टिंगल केली आहे. दास दादांच्या निधनाने कपिल शर्मा शोमधील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.
दास दादांच्या निधनाने संपूर्ण टीमवर शोककळा
शोच्या टीमने त्यांच्या सोशल मीडियावर दास दादांना श्रद्धांजली वाहिली आहे. याशिवाय कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आज आम्ही जड अंतःकरणाने ही बातमी तुम्हाला सांगत आहोत. दास दादा हे कॅमेरामागील एक चांगले व्यक्ती होते, ज्यांनी 'द कपिल शर्मा शो'च्या सुरुवातीपासून असंख्य सुंदर क्षण कॅमेरात कैद केले. ते केवळ एक असोसिएट फोटोग्राफर नव्हते तर ते आमच्या कुटुंबाचा एक भाग होते," या दुःखद पोस्टखाली नेटकऱ्यांनी आणि शोच्या कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. दास दादा अनेकांचे लाडके होते. याशिवाय कपिल शर्मा शोमध्ये जे कलाकार यायचे ते आवर्जुन दास दादांसोबत फोटो काढायचे.
कॉमेडियन आणि कपिल शर्मा शोमधील अभिनेता कीकू शारदाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दास दादांच्या निधनावर शोक व्यक्त करत, "आम्ही तुम्हाला मिस करू दास दादा," असे लिहिले आहे. दास दादा यांना त्यांच्या कामासाठी २०१८ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दास दादांच्या निधनामुळे 'द कपिल शर्मा शो'ची टीम आणि चाहत्यांमध्येही शोककळा पसरली आहे. हसतमुख चेहऱ्याचा, जमिनीवर पाय असणारा आणि सुंदर फोटो काढणारा एक व्यक्ती आपल्याला सोडून गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे.