"कान्स"मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची भावुक पोस्ट, म्हणाल्या, 'आनंद आणि मन भरून आलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 03:03 PM2024-05-27T15:03:45+5:302024-05-27T15:04:24+5:30

छाया कदम यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

Chhaya Kadam Shares Her First emotional Post After Won Grand Prix Awards At Cannes Film Festival | "कान्स"मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची भावुक पोस्ट, म्हणाल्या, 'आनंद आणि मन भरून आलं'

"कान्स"मध्ये पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांची भावुक पोस्ट, म्हणाल्या, 'आनंद आणि मन भरून आलं'

मराठमोळ्या छाया कदम गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. यंदा "कान फिल्म फेस्टिव्हल'च्या रेड कार्पेटवर आईची साडी नेसून व नथ घालून त्या अवतरल्या. इतकंच नाही तर छाया यांची महत्त्वाची भूमिका असलेला 'All We Imagine As Light' या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव झालेला पाहायला मिळतोय.  या भारतीय चित्रपटाला 'कान्स'मध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार मिळाला. पुरस्कार जिंकल्यावर छाया कदम यांनी खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

 'कान्स'मध्ये 'ग्रँड प्रिक्स' पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. या पुरस्कारावर भारतीय सिनेमाने आपलं नाव कोरल्याने सध्या सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. छाया कदम यांनी इन्स्टाग्रामवर 'कान्स'मधील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये छाया कदम यांच्या चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान पाहायला मिळतयं.  छाया कदम यांच्या या पोस्टवर चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होतोय.

छाया यांनी या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'आपल्या मातीतल्या आपल्या माणसांची गोष्ट आपल्या वाटेला येते, तेव्हा तिच्यात जीव ओतून टाकलेला एक एक क्षण कान्स फिल्म फेस्टीवल उजाळून टाकतो, तेव्हा आपल्या मागच्या सगळ्या प्रवासातल्या सगळ्या सिनेमांची - लेखकांची आणि दिग्दर्शकांची आठवण येते. कारण त्यांनी त्या-त्या वेळेस माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच , एक एक पाऊल पुढे पडत हा प्रवास इथ पर्यंत येऊन पोहचला आहे. माझ्या आजवरच्या प्रवासातल्या सगळ्यांचे खूप खूप आभार.  तुमच्यामुळे आज ही छाया इथवर पोहचली आहे. खूप समाधान - आनंद आणि मन भरून आले'.

'All We Imagine As Light' हा सिनेमा पायल कपाडिया यांनी  दिग्दर्शित केलाय. कनी कुसरुती, दिव्या प्रभा आणि छाया कदम यांच्या या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत.  चित्रपटात केरळमधून येऊन मुंबई शहराच्या रुग्णालयात काम करणाऱ्या आणि याकाणी एका लहान अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या दोन नर्सचं जीवन दाखवलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील  ‘All We Imagine As Light’च्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.  छाया कदम यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. छाया यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' मध्ये काम केलं. शिवाय आमिर खानच्या प्रॉडक्शनच्या 'लापता लेडीज' सिनेमात छाया यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक होतंय.

Web Title: Chhaya Kadam Shares Her First emotional Post After Won Grand Prix Awards At Cannes Film Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.